How to use turmeric to remove facial hair | चेहऱ्यावरील नको असलेले केस हळदीच्या मदतीने दूर करा, कसे ते वाचा!
चेहऱ्यावरील नको असलेले केस हळदीच्या मदतीने दूर करा, कसे ते वाचा!

चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांमुळे अनेकदा महिलांना चिंता लागलेली असते. प्रत्येक महिलेच्या केसांची ग्रोथ वेगवेगळी असते. चेहऱ्यावर अतिरिक्त केस येण्याचं कारण हार्मोन्सचं असंतुलन असतं. अशात हे नको असलेले केस दूर करण्यसाठी महिला वॅक्सिंग, प्लकिंग किंवा थ्रेडींगचा करतात. चेहऱ्यावरील हे नको असलेले केस दूर करण्यासाठी काही घरगुती उपायही आहेत. त्यातीलच एक उपाय म्हणजे हळद. हळदीच्या मदतीने चेहऱ्यावरील नको असलेले केस दूर केले जाऊ शकतात. चला जाणून घेऊन यासाठी हळदीचा कसा करावा वापर.

साहित्य - अर्धा कप थंड दूध, अर्धा कप बेसन, १ चमचा हळद पावडर आणि १ चमचा मीठ.

कसं कराल तयार?

- एका वाटीमध्ये थंड दूध, बेसन, मीठ आणि हळद टाकून पेस्ट तयार करा.

- आता ही पेस्ट ज्या भागात नको असलेले केस आले असतील तिथे लावा. 

- पेस्ट लावल्यावर सर्कुलर मोशनमध्ये त्या जागेवर काही मिनिटांसाठी मसाज करा.

- त्यानंतर १५ ते २० मिनिटे पेस्ट तशीच चेहऱ्यावर राहू द्या.

- २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी एकदा त्वचेवर थोडी पेस्ट लावून टेस्ट करा. जर तुम्हाला हळदीपासून अ‍ॅलर्जी असेल तर तुम्हाला त्वचेवर खाज आणि जळजळ होऊ लागेल.

हळद लावल्यावर त्वचेवर पिवळे डागही राहू शकतात. हे डाग दूर करण्यासाठी कॉटनला अ‍ॅपल व्हिनेगर लावून ते डाग स्वच्छ करा.

हळदीचे फायदे

सुंदरता वाढवण्यासाठी हळदीचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. हळदीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. जे त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. त्वचेवरील नको असलेले केस दूर करण्यासाठीही हळदीचा फायदा होतो. हळदीमध्ये काही वस्तू मिश्रित करून तुम्ही हे करू शकता.

(टिप : हळदीची ही पेस्ट थेट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर एक पॅच लावून टेस्ट करा. जर तुम्हाला अ‍ॅलर्जी असेल तर हा उपाय करू नका.)


Web Title: How to use turmeric to remove facial hair
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.