तुरटी आणि मिठाचा 'असा' करा वापर, घामाची दुर्गंधी दूर होण्यास मिळेल मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:43 IST2024-12-21T14:41:52+5:302024-12-21T14:43:24+5:30
Alum and Salt : तुरटी आणि मीठ या मिश्रणाचा वापर करून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.

तुरटी आणि मिठाचा 'असा' करा वापर, घामाची दुर्गंधी दूर होण्यास मिळेल मदत!
Alum and Salt : सामान्यपणे घामाच्या दुर्गंधीची समस्या उन्हाळ्यात अधिक जाणवते. पण काही लोक असे असतात ज्यांच्या घामाची दुर्गंधी हिवाळ्यातही येते. मग ही दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओ, परफ्यूमचा वापर केला जातो. मात्र, यानेही काखेत इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशात एक नॅचरल उपाय करून तुम्ही घामाची दुर्गंधी दूर करू शकता. हा उपाय म्हणजे तुरटी आणि मीठ. आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करा. या पाण्याने आंघोळ केल्यावर घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळले.
तुरटी आणि मीठ या मिश्रणाचा वापर करून वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते. त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास हे मिश्रण खूप फायदेशीर ठरतं. अशात याचे काय काय फायदे होतात हे जाणून घेऊ.
- दात आणि हिरड्यांसाठीही तुरटी आणि मिठाच्या मिश्रणाचा वापर केला जाऊ शकतो. याच्या वापराने हिरड्यांवरील सूज, हिरड्यांचं दुखणं आणि तोंडातील फोड दूर केले जाऊ शकतात.
- जर जखमेतून रक्त वाहत असेल तर जखमेवर तुरटी आणि मिठाचं थोडं पावडर लावावं. असं केल्याने रक्तस्त्राव बंद होऊ शकतो. सोबतच जखमेचा इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो.
- पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी तुरटी रामबाण उपाय ठरते. गरम पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करा. या पाण्यात काही वेळ पाय टाकून बसा. असं केल्याने टाचांना पडलेल्या भेगा मुलायम होतील. त्या नंतर घासून साफ करा.
- घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात तुरटी आणि मीठ मिक्स करणं हा एक उपाय तर आहेच. सोबतच तुरटी पाण्यात भिजवून आंघोळीनंतर काखेत फिरवा. यानेही घामाची दुर्गंधी दूर होण्यास मदत मिळेल.