शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

लांब, मजबूत आणि मुलायम केसांसाठी लसूण आणि कांद्याच्या सालीचं खास तेल, जाणून घ्या कसं बनवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 11:57 IST

Hair Care : तुम्हीही केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास तेलाबाबत सांगणार आहोत.

Oil For Faster Hair Growth : आपल्या काही चुकांमुळे आजकाल कमी वयातच केस गळतात आणि पांढरे होतात. वेळीच यावर काही उपाय केले नाही तर लवकरच टक्कलही पडतं. तुम्हीही केसांच्या वेगवेगळ्या समस्यांनी हैराण असाल तर आज आम्ही तुम्हाला एका खास तेलाबाबत सांगणार आहोत. ज्याद्वारे तुम्ही केसगळती थांबवू शकता, केस लांब, चमकदार आणि मजबूत ठेवू शकता. 

केसांसाठी फायदेशीर हे खास तेल तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त लसूण आणि कांद्याच्या सालीची गरज पडेल. सामान्यपणे जास्तीत जास्त लोक या साली कचऱ्यात फेकतात. पण त्या खूप फायदेशीर असतात. 

तेल बनवण्यासाठी साहित्य

कांद्याची साल २ वाट्या

लसणाची साल १ वाटी

एक वाटी खोबऱ्याचं तेल

आल्याचे तुकडे १ वाटी

कसं तयार कराल तेल?

सगळ्यात आधी लसूण आणि कांद्याच्या सालीमध्ये आलं आणि खोबऱ्याचं तेल टाकून २० ते २५ मिनिटे शिजवा. शिजल्यानंतर खोबऱ्याच्या तेलाचा रंग बदलेल. नंतर हे तेल एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करा. या तेलाचा वापर तुम्ही २ महिन्यांपर्यंत करू शकता.

कसं वापराल हे खास तेल?

रात्री झोपण्याआधी लसूण आणि कांद्याच्या सालीचं हे तेल हलकं गरम करून केसांवर लावा. नंतर हलक्या हाताने मालिश करा. नंतर केस शाम्पूने धुवून घ्या. केस धुताना डोक्याची त्वचा जोरजोरात घासू नका. हे तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता.लसूण आणि कांद्याच्या सालीच्या तेलाचे फायदे

डोक्याच्या त्वचेला पोषण मिळेल

लसणाच्या सालीमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल, अ‍ॅंटी-वायरस आणि अ‍ॅंटी-फंगल गुण आढळतात. जे डोक्याची त्वचा हेल्दी बनवण्यास मदत करतात.

कोंड्याची समस्या होईल दूर

जर तुमच्या केसांमध्ये नेहमीच कोंडा होत असेल तर कांदा आणि लसणाच्या सालीचं हे तेल खूप फायदेशीर ठरू शकतं. कांद्याच्या सालीमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात, जे केसांमधील कोंडा कमी करण्यास मदत करतात.

आल्याने केस होतील मजबूत

आल्यातून केसांना भरपूर पोषण मिळतं. ज्यामुळे केसगळती, केस तुटणे अशा समस्या दूर होतात. नियमितपणे केसांना आल्याचा रस लावल्याने केस मजबूत आणि मुलायम होतात.

खोबऱ्याचं तेल केसांसाठी वरदान

जर तुम्ही केसगळतीच्या समस्येने हैराण अशाल तर खोबऱ्याचं तेल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. कारण यात अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी, अ‍ॅंटी-मायक्रोबिअल आणि अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट गुण आढळतात. जे केसांना मजबूत करण्यास मदत करतात.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स