वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 01:16 PM2020-02-08T13:16:35+5:302020-02-08T13:23:39+5:30

सगळ्याच लोकांचं वय ३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणवतात.

How to take care when you facing problem of hair fall and white hairs | वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले

वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले

googlenewsNext

सगळ्याच लोकांचं वय ३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या जाणवतात. त्वचा केस यांवर वय वाढीच्या खुणा दिसायला सूरूवात होते. खाण्यापिण्यात असलेली अनियमीतता आणि व्यस्त जीवनशैली यांमुळे कमी वयात सुद्धा केस पांढरे व्हायला सूरूवात होतात. २७ ते ३०  टक्के लोकांचे वय ३० वर्षापेक्षा कमी असले तरी केस पांढरे व्हायला सुरूवात होते. जर तुम्हाला सुद्धा वेळेआधीच केस गळण्याची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवत असेल तर आज आम्ही तुम्हाला काही  टिप्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची योग्यप्रकारे काळजी घेऊ शकता. 

जर तुमचे केस विंचरत असताना फणीत अडकून तुटत असतील तर तुम्ही तुमचे केस लहान ठेवा. कारण जर मोठे केस असतील तर जास्त तुटण्याचा धोका असतो. त्यासाठी केसांना लहान ठेवा. केस मजबूत राहण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचं असतं ते म्हणजे स्काल्प व्यवस्थित राहणे. स्काल्पची काळजी घ्या. केसांमध्ये कोंडा होऊ देऊ नका.  केसांवर शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करा. 

केसांच्या मजबूतीसाठी प्रोटीन्सचा आहार खूप महत्वाचा असतो. त्यासाठी आहारात प्रोटिन्स असलेल्या पदार्थाचा समावेश करा. त्यासाठी अंडी, ताजी फळं, ड्राटफ्रुट्सचा समावेश आहारात करा. टोमॅटो, आवळा, भोपळा बियाणे हे आपल्या नियमित आहारात घ्या.

केसांची आठवड्यातून एकदा बदामाच्या आणि नारळाच्या तेलाने मालिश करा. तुमचे जास्त केस गळत असतील तर तुम्ही चहा आणि कॉफी घेण्याचं टाळा. तसेच नशायुक्त पदार्थांचे सेवन करू नका. धुम्रपान करण्याचे टाळा. त्यामुळे केस गळण्याचे तात्काळ बंद होईल. जास्तीत जास्त पाणी प्या.

केस गळायला लागल्यानंतर केमिकल्सचा वापर न करता कांद्याला मिक्सरमध्ये थोडेसे पाणी घेऊन वाटावा. त्यानंतर कांद्याचा रस काढून घ्यावा. हा रस केसांना लावावा. तीन मिनिटं हा रस ठेवू द्यावा. त्यानंतर चांगल्या शॅम्पूने केस धुवून टाकावेत. कांद्याचा रस आठवड्यातून तीनवेळा लावणे आवश्यक आहे. ( हे पण वाचा-दाढी वाढत नसल्याने हॅण्डसम लूक मिळत नाहीये? 'या' तेलांनी होईल फायदा)

रात्रीच्या वेळी केस धुणं टाळा. ओल्या केसांवर कंगवा फिरवू नका. कारण तुमच्या या सवयीमुळे केस जास्त गळू शकतात. केमिकल्सयुक्त जेलचा वापर केसांवर करू नका. कारण त्यामुळे केस पांढरे होऊ शकतात. ( हे पण  वाचा -गुलाबी गाल मिळवण्याची इच्छा पूर्ण करेल गाजराचा फेसपॅक, बघणारे बघतच राहतील!)

Web Title: How to take care when you facing problem of hair fall and white hairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.