दाढी वाढत नसल्याने हॅण्डसम लूक मिळत नाहीये? 'या' तेलांनी होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:33 PM2020-02-06T12:33:44+5:302020-02-06T12:45:21+5:30

सध्याच्या काळात बिअर्ड लुकचा खूप जास्त क्रेझ आहे.

How to got a handsome look because of beard | दाढी वाढत नसल्याने हॅण्डसम लूक मिळत नाहीये? 'या' तेलांनी होईल फायदा

दाढी वाढत नसल्याने हॅण्डसम लूक मिळत नाहीये? 'या' तेलांनी होईल फायदा

Next

सध्याच्या काळात बिअर्ड लुकचा खूप जास्त क्रेझ आहे. सगळ्याच मुलांना अभिनेत्यांप्रमाणे बिअर्डचा परफेक्ट लूक हवा असतो. त्यासाठी वेगवेगळ्या क्रिम लावण्यापासून शेपिंग करण्याच्या ट्रिक्स पुरूष वापरत असतात. आज आम्ही तुम्हाला दाढी वाढवण्यासाठी कोणत्या खास तेलाचा वापर करतात. त्याबद्दल सांगणार आहोत. दाढी उगवण्याचे तेल पुरूषांसाठी  खूप फायदेशीर ठरत असते.  दाढीच्या केसांना पोषण देण्यासाठी या तेलाचा वापर केला जातो. यासाठी विशिष्ट प्रकारच्या तेलाचा वापर केला जातो.

बदामाचं तेल

बदामाचं तेल दाढी वाढवण्यासाठी महत्वपूर्ण समजलं जातं. बादामाच्य तेलात फॅट आणि प्रोटीन आणि व्हिटामीन ई असतं. या व्यतिरिक्त बादामाच्या तेलात अनेक पोषक तत्व असतात.  बदामाच्या तेलात जिंक आणि मोनोसॅच्यूरेटेड फॅटी एसिड्स असल्यामुळे केसांची वाढ करण्यासाठी आणि पुळ्याचे इन्फेक्शन कमी करण्यासाठी  बदामाचे तेल फायदेशीर ठरत असते. त्वचेवरील केसांसाठी बदामाचे तेल खूपचं हलके असते. त्वचेत खूप सोप्या पध्दतीने एब्जॉर्ब होते. यामुळे  दाढीच्या केसांची वाढ होण्यासाठी बदामाचे तेल फायदेशीर ठरत असते. त्यातील एन्टीऑक्सिडंट्समुळे त्वचेला फारच उपयुक्त आहे. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो वाढेल. त्याबरोबरच   दाढीच्या केसातील कोंडा दूर होण्यासाठी फायदेशीर ठरेल.

जोजोबा तेल

दाढीचे केस चांगल्याप्रकारे उगवण्यासाठी जोजोबा तेल खूपचं महत्तपूर्ण असते. जोजोबा ऑईल दाढीला मऊ मुलायम ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे दाढी चमकदार दिसते. अनेकदा दाढीची त्वचा कोरडी पडलेली असते. त्यावेळी खाजेपासून आणि जळजळीपासून सुटका मिळवण्यासाठी  जोजोबा तेलाचा वापर केला जातो. प्रदूषणामुळे दाढीचे  केस खराब होत असतात. त्यावेळी जोजोबा तेलाने मालिश केल्यास त्वचेवर आणि दाढीच्या केसांवर प्रदूषणामुळे होत असलेलं नुकसान टाळता येऊ शकतं. ( हे पण वाचा-पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!)

नारळाचे तेल

नारळाचं तेल स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे आहे. अनेक  फायदे नारळाच्या तेलाचे आहेत. नारळाचे तेल कोरडी त्वचा आणि पुळ्यासाठी सुद्धा सहायक ठरते. ह्यामुळे आपल्या त्वचेवरच्या पुळ्या सुद्धा दूर होतील.त्यामुले दाढीवर पुळ्या येणं थांबेल. दाढीच्या केसांना गळण्यापासून रोखण्यासाठी आणि मजबूत बनवण्यासाठी नारळाच्या तेलाने रोज मसाज करा. या तेलाचा वापर केल्यामुळे दाढीचे केस चांगले राहतात. दाढीच्या केसांची चांगली वाढ होण्यासाठी  नारळाचं तेल हा बेस्ट उपाय आहे. ( हे पण वाचा-सकाळी उठल्यानंतर 'या' चुका कराल तर वयाआधीच म्हातारे दिसाल)

Web Title: How to got a handsome look because of beard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.