एका महिन्यात किती वेळा दाढी करावी? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 15:05 IST2025-01-07T14:51:46+5:302025-01-07T15:05:37+5:30

दाढी ठेवणाऱ्या लोकांनी खूप काळजी घेणं महत्वाचं आहे. खासकरून थंडीच्या दिवसात अधिक काळजी घ्यावी लागते.

How often should shave your beard is doing this regularly good or bad | एका महिन्यात किती वेळा दाढी करावी? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट!

एका महिन्यात किती वेळा दाढी करावी? जाणून घ्या काय सांगतात एक्सपर्ट!

Is Shaving Beard Daily Good or Bad: बऱ्याच लोकांना दाढी मोठी ठेवण्याची सवय असते आणि ते महिने दाढीचे केस वाढवत असतात. तर काही लोकांना क्लीन शेव लूक आवडतो. अशात ते रोज दाढी करतात. पुरूषांच्या पर्सनॅलिटीतही दाढीचं महत्वाचं योगदान असतं. तसेच लूकही वेगळा दिसतो. पण काही लोक दाढीला वैतागतात आणि याबाबत कन्फ्यूज असतात की, त्यांनी महिन्यातून किती वेळ दाढी करावी? 

दाढी ठेवणाऱ्या लोकांनी खूप काळजी घेणं महत्वाचं आहे. खासकरून थंडीच्या दिवसात अधिक काळजी घ्यावी लागते. जर दाढी चांगली स्वच्छ केली नाही तर केसांमध्ये धूळ, तेल, बॅक्टेरिया आणि डेड स्कीन सेल्स जमा होतात. दाढी स्वच्छ करण्यासाठी चांगलं फेस वॉश किंवा क्लींजर वापरावं. जर दाढीची व्यवस्थित स्वच्छता केली नाही तर त्वचेची रोमछिद्रे बंद होतील आणि त्यामुळे त्वचेसंबंधी समस्याही होतील.

एक्सपर्टनुसार, महिन्यातून किती वेळा शेव्हिंग करावं, याचा असा काही वैज्ञानिक नियम नाही. हे तुमची आवड आणि कंम्फर्ट यावर अवलंबून आहे. सामान्यपणे पुरूषांनी आठवड्यातून एकदा दाढी करावी. महिन्यातून ४ ते ५ वेळा शेव करणं नॉर्मल मानलं जातं. यानं त्वचाही सहजपणे चांगली साफ होईल. जर तुमची त्वचा जास्त सेन्सिटीव्ह असेल तर रोज दाढी करणं टाळलं पाहिजे. कारण त्वचेसंबंधी समस्यांचा धोका अधिक असतो. 

अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जर एखादी व्यक्ती दाढीवर रोज ब्लेड फिरवत असेल तर स्कीन सेल्सची लेअर नष्ट होते. अशात रोज शेव्हिंग केलं तर स्कीनला रिपेअर होण्याचा वेळ मिळत नाही. ज्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होतात. अशात लोकांना रोजऐवजी दोन दिवसांच्या गॅपनंतर शेव्हिंग करावं. अशानं स्कीन हेल्दी राहणार आणि लूकही चांगला राहील. जे लोक अनेक महिने दाढी ठेवतात, त्यांनी दाढीची स्वच्छताही व्यवस्थित करावी. कारणमध्ये धूळ-माती चिकटून असते. ज्यामुळे स्कीन प्रभावित होते. 

Web Title: How often should shave your beard is doing this regularly good or bad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.