शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

केसांच्या वाढीसाठी स्काल्प स्क्रब ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं तयार करायचं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 13:27 IST

जेव्हा केसांची काळजी घ्यायची गोष्ट असते. तेव्हा आपण आपले केस बाहेरून कसे दिसतात.

जेव्हा केसांची काळजी घ्यायची असते. तेव्हा आपण आपले केस बाहेरून कसे दिसतात. याकडे आपण जास्त लक्ष देत  असतो. पण अनेकदा आपण स्काल्प आणि केसांची त्वचा यांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे स्काल्पवर पुळ्या येणे,  खाज येणे, कोंडा होणे या समस्या उद्भवत असतात. स्काल्पच्या मृतपेशींना स्क्रब करून तुम्ही एक्सफोलिएट केलं तर तुम्ही केसांच्या संबंधीत  अनेक समस्यांपासून वाचू शकता. 

(Image credit- her zindagee)

वातावरणातील धुळ, माती, प्रदुषण यांमुळे स्काल्पच्या पोर्सवर घाण जमा होत असते. त्यामुळेच स्काल्प चांगल ठेवणं  कठिण होऊन बसंत.  सध्याच्या काळात वाढत जात असलेल्या प्रदूषणाच्या वातावरणात त्वचेची आणि केसांची काळजी घ्यायची असेल तर  घरगुती स्क्रबचा वापर करून तुम्ही चांगले केस मिळवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही एक्स्ट्रा खर्च करावा लागणार नाही.  चला तर मग जाणून घेऊया केसांना अनेक फायदे मिळवून देणारं स्क्रब कसं तयार करायचं.

लिंबू आणि सी सॉल्टचे स्क्रब

(image credit-the makeup dummy)

सी सॉल्ट आणि लिंबाचं स्क्रबचा वापर करून तुम्ही एक चांगलं हेअरस्क्रब तयार करू शकता. त्यासाठी एका लहान बाऊलमध्ये ३ चमचे सी सॉल्ट. २ चमचे लिंबाचा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑईल घ्या. सगळयात आधी केसांवर  थोडंस पाणी शिंपडा. मग हे तयार केलेलं मिश्रण एकत्र करून केसांना लावा.  आपल्या स्काल्पला एक्सफोलिएट करण्यासाठी काही वेळ मसाज करा. मसाज करून झाल्यानंतर काही वेळानी शॅम्पू आणि कंडिशनरने धुवा.

बेकिंग सोडा आणि दालचीनी पावडर

स्काल्प स्क्रब हेअर स्क्रबसाठी बेकिंग सोडा आणि दालचीनी पावडरचा वापर करा.  त्यानंतर १ चमचा दालचीनी पावडरमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण चांगलं एकत्र करा. नंतर पाण्याने केल थोडे नरम करा. नंतर या स्क्रबने केसांची मसाज करा. केसांची मसाज करून झाल्यानंतर केस शॅम्पु आणि कंडीशनरने धुवून टाका. ( हे पण वाचा- केस वाढण्याची वाट बघत असाल, तर आल्याचा वापर तुमची लांब केसांची इच्छा करेल पूर्ण)

मध आणि साखर 

(image credit- youtube)

मध आणि साखरेचे सौंदर्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. एका बाऊल मध्ये १ चमचा मध, १ चमचा ऑलिव्ह ऑईल, ४ चमचे साखर घाला. मग थोडंस पाणी घालून हे मिश्रण एकत्र करा. या स्क्रबने केसांची मसाज करा. मग २० मिनिटांनी केस धुवून टाका. स्काल्पवरची डेड स्कीन काढून टाकण्यासाठी तसचं केसांची वाढ होण्यासाठी हे स्क्रब फायदेशीर ठरत असतं. ( हे पण वाचा-कमी वयातच त्वचेवर आलेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी 'हे' फेशियल ठरेल इफेक्टिव्ह)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स