छोटे डोळे मोठे दाखवण्यासाठी 'या' मेकअप टिप्सचा वापर करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 02:01 PM2018-08-19T14:01:00+5:302018-08-19T14:10:20+5:30

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात डोळ्यांची मोठी भूमिका असते. प्रत्येकाचे डोळे वेगळे असतात. काहींचे मोठे असतात, तर काहींचे बारिक. अनेकदा मेकअप केल्यानंतर किंवा फोटोशूट करताना डोळे लहान दिसतात.

How to make eyes look bigger with make up | छोटे डोळे मोठे दाखवण्यासाठी 'या' मेकअप टिप्सचा वापर करा!

छोटे डोळे मोठे दाखवण्यासाठी 'या' मेकअप टिप्सचा वापर करा!

Next

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यात डोळ्यांची मोठी भूमिका असते. प्रत्येकाचे डोळे वेगळे असतात. काहींचे मोठे असतात, तर काहींचे बारिक. अनेकदा मेकअप केल्यानंतर किंवा फोटोशूट करताना डोळे लहान दिसतात. अनेकदा महिला डोळे मोठे दिसण्यासाठी अनेक टिप्स फॉलो करतात. जाणून घेऊयात डोळ्यांचा मेकअप करण्याच्या अशा काही टिप्सबाबत ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य आणखी खुलवू शकता. 

जर तुम्हाला मेकअप करण्याची आवड असेल आणि तुम्ही डोळ्यांकडे दुर्लक्ष करत असा तर तुम्ही चूक करत आहात. तुम्ही तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य वाढविण्यावर भर दिला पाहिजे. जर तुम्ही पार्टीसाठी तयार होत असाल तर सर्वात आधी तुमच्या भुवया आयब्रो ब्रशच्या सहाय्याने खालच्या बाजूस करा. आणि त्यानंतर त्यावर ब्रश फिरवा. आयब्रो पातळ असतील तर त्यावर आयब्रो पेन्सिल फिरवा. त्यामुळे आयब्रो डार्क दिसतील. आयब्रोचे केस सेट करण्यासाठी व्हॅसलिन किंवा अन्य पेट्रोलिअम जेलीचाही वापर करता येतो. 

जर तुमचे डोळे छोटे असतील तर हायलायटरचा उपयोग करणं तुम्हाला फायदेशीर ठरेल. हायलटरमुळे डोळे मोठे आणि बोल्ड दिसण्यास मदत होईल. अशा डोळ्यांसाठी सर्वात आधी डोळ्यांखाली थोडं सिमर हायलायटर लावा. पण चेहऱ्यावर कन्सिलर लावल्यानंतरच ही प्रक्रिया करा. अशाप्रकारे मेकअपच्या सहाय्याने तुम्ही तुमचे डोळे मोठे आणि चमकदार बनवू शकता. 

जर तुमचे डोळे बारिक आहेत आणि जर त्यांना तुम्ही चारही बाजूंनी लायनर लावत असाल तर, असं करू नका. यामुळे तुमचे डोळे आणखी बारिक दिसतील. त्याऐवजी जर तुम्ही लायनर तुमच्या खालच्या पापणीच्या त्वचेच्या कडेवर लावलं पाहिजे. तुम्हाला हे एकून आश्चर्य वाटेल की, व्हाईट आयलायनर वापरूनही तुम्ही डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यासोबतच डोळे मोठे दाखवू शकता. त्यासाठी डोळ्यांच्या इनक कॉर्नरवर व्हाईट लायनरचा वापर करा.

डोळे मोठे दाखवण्यासाठी सर्वात महत्त्वाची मेकअप ट्रिक म्हणजे तुमच्या डोळ्यांच्या पापण्या कर्ल करा. तसेच आयलॅश कलर किंवा मस्कराही वापरू शकता. त्यामुळे डोळे मोठे आणि सुंदर दिसतील. 

Web Title: How to make eyes look bigger with make up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.