केसांच्या समस्यांवर 'हा' होममेड हेयर मास्क ठरतो फायदेशीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 19:41 IST2018-12-13T19:37:36+5:302018-12-13T19:41:40+5:30
अनेक महिला आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी केसांची काळजी घेतात. दाट, लांब आणि मुलायम केसांचा ट्रेंड कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. काहींचे केस नॅचरली फार सुंदर असतात.

केसांच्या समस्यांवर 'हा' होममेड हेयर मास्क ठरतो फायदेशीर!
अनेक महिला आपलं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी केसांची काळजी घेतात. दाट, लांब आणि मुलायम केसांचा ट्रेंड कधीच आउट ऑफ फॅशन होत नाही. काहींचे केस नॅचरली फार सुंदर असतात. त्यामुळे त्यांना ट्रिटमेंटची गरज भासत नाही. पण काहींच्या केसांची वाढ खुंटते तर काहींना केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहाराचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करण्याऐवजी होममेड हेअर मास्कचा वापर करणं फायदेशीर ठरतं. यामुळे केसांना नुकसान पोहोचणार नाही आणि मुलायम होण्यास मदत होईल.
हेयर मास्क तयार करण्यासाठी साहित्य :
- कोरफडीचा गर
- नारळाचं तेल
- ऑलिव्ह ऑइल
- एरंडेल तेल
- बदामाचं तेल
- व्हिटॅमिन ई कॅप्सुल
हेयर मास्क तयार करण्याची पद्धत :
एका बाउलमध्ये एक चमचा कोरफडीचा गर, एक चमचा नारळाचं तेल, ऑलिव्ह ऑइल, एरंडेल तेल, बदामाचं तेल आणि व्हिटॅमिन ई कॅप्सुल एकत्र करा. तुमचा हेयर मास्क तयार आहे.
हेयर मास्क लावण्याची पद्धत :
तयार हेयर मास्क आपल्या डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा आणि 5 मिनिटं व्यवस्थित मसाज करा. थोडे सैलसर केस बांधा आणि शॉवर कॅपने कव्हर करून रात्रभर तसचं ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी केस माइल्ड शॅम्प्यूने धुवून टाका. आठवड्यातून एकदा असं केल्याने केसांची वाढ होण्यासोबतच केस मुलायम आणि दाट होण्यास मदत होते.