लॉकडाऊनमुळे वॅक्सिंगऐवजी रेजर?; मग खाज टाळण्यासाठी 'या' उपायांचा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 01:59 PM2020-05-02T13:59:42+5:302020-05-02T14:15:44+5:30

पार्लर आणि सलून बंद असल्यामुळे आठवड्यातून एकदा सलूनमध्ये जात असलेल्या लोकांना घरी राहून सगळं मॅनेज करावं लागत आहे.

How to get rid of burns and rashes caused by razors while using it in lockdown myb | लॉकडाऊनमुळे वॅक्सिंगऐवजी रेजर?; मग खाज टाळण्यासाठी 'या' उपायांचा करा वापर

लॉकडाऊनमुळे वॅक्सिंगऐवजी रेजर?; मग खाज टाळण्यासाठी 'या' उपायांचा करा वापर

Next

लॉकडाऊनने लोकांना सगळी कामं घरच्याघरी कशी करता येतील याबाबत शिकवलं आहे. बाहेर जाण्यासाठी परवानगी नसल्यामुळे लोक घरच्याघरी स्वतःची काम करण्यासाठी जुगाड करताना दिसून येत आहे. या सगळ्यात अत्यावश्यक सेवा जरी सुरळीत सुरू असल्या, तरी पार्लर आणि सलून बंद असल्यामुळे आठवड्यातून एकदा सलूनमध्ये जात असलेल्या लोकांना घरी राहूनंच सगळं मॅनेज करावं लागत आहे.

सगळ्यात जास्त महिला हातांचे किंवा पायांचे वॅक्सींग करण्याासाठी पार्लरमध्ये जातात. पण सध्या पार्लर बंद असल्यामुळे अनेकजण वॅक्सिंगऐवजी घरीच रेजरचा वापर करून आपले नको असलेले केस काढत आहेत. अंडरआर्म्स आणि हातापायांवर रेजरचा वापर केल्यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. रेजरचा वापर केल्यानंतर त्वचेची काळजी या उपायांनी तुम्ही घेऊ शकता.

एलोवेरा 

एलोवेराचा वापर तुम्ही इमरजेंन्सीमध्ये अनेकप्रकारे करू शकता. एलोवेरात असलेले औषधी गुणधर्म रेजरच्या वापरानंतर येणारी खाज  कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुमच्या घराच्या आजूबाजूला एलोवेराचं रोपटं असेल तर तुम्ही फ्रेश एलोवेराचा वापर करू शकता.  एलोवेरा जेल सुद्धा खाज कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. रेजरचा वापर करून झाल्यानंतर एलोवेरा जेल त्या भागाला काहीवेळ लावून ठेवा. मग ती जागा धुवून टाका.

टी बॅग

चहामध्ये टॅनिन हा घटक असतो. त्वचेची सुज कमी करण्यासाठी टॅनिन एसिडचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी प्रभावीत जागेवर फक्त टी बॅग लावा. धुतल्यानंतर पाच मिनिटं तसंच राहू द्या. या उपायामुळे रेजरच्या वापरामुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होऊ शकते. 

टी-ऑयल

Underarms ki Badbu ke Upay:शरीर से दुर्गंध आती ...

केमिकल्सविरहीत उपाय म्हणून तुम्ही टी ऑईलचा वापर करू शकता. त्यात अनेक एंटी बॅक्टेरियल आणि एटीसेप्टिक गुण असतात. रेजरमुळे आलेली सुज आणि लाल झालेल्या त्वचेसाठी टी ऑईलचा वापर केला जातो.  त्यासाठी शेविंग केल्यानंतर तुम्ही कापसाला हे तेल लावून  त्वचेवर लावा.  ( हे पण वाचा- वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव)

अॅपल व्हिनेगर

अॅपल व्हिनेगरचा त्वचेवर वापर करू शकता. इन्फेक्शन आणि त्वचेची सूज कमी करण्यासाठी एपल व्हिनेगर फायदेशीर ठरतं. त्यासाठी कापसावर व्हिनेगर घेऊन शेविंग केलेल्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका. या उपायामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम राहील. (हे पण वाचा-पचनक्रिया कितीही असेल खराब; तरी 'या' उपायांनी पोटाचे विकार नक्की राहतील लांब...)

Web Title: How to get rid of burns and rashes caused by razors while using it in lockdown myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.