गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 15:43 IST2018-10-23T15:42:20+5:302018-10-23T15:43:49+5:30
अनेकदा गुडघ्यांच्या काळेपणामुळे फॅन्सी कपडे परिधान करणं टाळलं जातं. गुडघे काळे होण्याची अनेक कारणं आहेत. काही लोकांमध्ये खराब जीवनशैलीमुळे ही समस्या दिसून येते तर काही लोकांमध्ये स्किनच्या विविध समस्यामुळे ही समस्या दिसून येते.

गुडघ्यांचा काळेपणा घालवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करतील मदत!
(Image Creadit : Miss and Missis web magazine)
अनेकदा गुडघ्यांच्या काळेपणामुळे फॅन्सी कपडे परिधान करणं टाळलं जातं. गुडघे काळे होण्याची अनेक कारणं आहेत. काही लोकांमध्ये खराब जीवनशैलीमुळे ही समस्या दिसून येते तर काही लोकांमध्ये स्किनच्या विविध समस्यामुळे ही समस्या दिसून येते. त्यातल्या त्यात महिला किंवा तरूणींच्या गुडघ्यांवरील काळपटपणामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आपण आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतो परंतु आपण हाताचे कोपर आणि गुडघ्यांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे त्यांचा काळेपणा वाढतो आणि ते तुमच्या सौंदर्याच्या आडही येतात.
गुडघ्यांची काळजी घेणं हे फार महत्त्वाचं असतं. जर दररोज गुडघे स्वच्छ ठेवले नाहीत तर त्यावर मळ साचतो आणि ते काळे दिसू लागतात. गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी महिला महागातल्या महागात ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. परंतु, याचा काहीही फायदा होत नाही. अशातच तुम्ही काही घरगुती पदार्थांचा वापर करूनही गुडघ्यांच्या त्वचेचा काळपटपणा दूर करू शकता.
खोबऱ्याचं तेल
काळपट त्वचेवर खोबऱ्याच्या तेलाने दररोज मालिश करा. पण लक्षात ठेवा मालिश करण्याआधी गुडघे साबणाने स्वच्छ करून घ्यावे. असं केल्याने हळूहळू काळपट झालेली त्वचा नितळ दिसू लागेल.
बदाम
काळे झालेल्या गुडघ्यांवर बदामाची पेस्ट वाटून लावा. याने जवळपास 15 मिनिटांपर्यंत मसाज करा आणि त्यानंतर पाण्याने गुडघे धुवून टाका. तसेच तुमच्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ई असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे काळी त्वचा उजळण्यास मदत होते.
हळदीची पावडर
हळदीची पावडर, दूध आणि काही थेंब तुळशीच्या पानांचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी गुडघ्यांवर लावा. सकाळी उठल्यानंतर गुडघे थंड पाण्याने धुवून घ्या. साधारणतः आठवडाभर असं केल्याने गुडघ्यांचा काळपटपणा दूर होण्यास मदत होईल.
लिंबाचा रस
लिंबामध्ये ब्लीचिंग एजेंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. ज्यामुळे गुडघ्यांवर लिंबाचा रस लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होण्यास मदत होते. लिंबाचा रस सुकल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.