काही जणांना पायांच्या टाचा कडक होतात आणि भेगा पडतात. हा त्रास त्यांना फक्त हिवाळ्यातचं नाही तर सगळ्याच ऋतूत जास्त  जाणवत असतो. त्यामुळे पायांना वेदना होतात, चालायला त्रास होतो, तसंच   दिसायला सुद्धा खराब वाटत असतं. आज आम्ही तुम्हाला पायांच्या टाचांना जर भेगा पडल्या असतील तर कोणत्याही केमिकल्सचा वापर न  करता आणि पैसे न घालवता पायांच्या टाचा कशा व्यवस्थीत दिसतील याबद्दल सांगणार आहोत.

लिंबू आणि वॅसलीन

सगळ्यात आधी एका वाटीत ५ ते ६ लिंबांचा रस घ्या. त्यानंचक त्यात एक चमचा वॅसलीन घालून चांगलं मिक्स करून घ्या.  त्यानंतर याची एक पेस्ट तयार होईल. त्यानंतर एका बादलीत पाणी गरम करा. मग कोमट पाण्यात १५ ते २० मिनीटांसाठी या पाण्यात पाय घालून बसा. नंतर पाय पाण्याबाहेर काढून चांगल्या मऊ कापडाने पाय पूसून घ्या नंतर वॅसलिन आणि लिंबाची पेस्ट पायांना लावून  हलक्या हाताने चोळा. नंतर पाय धुवून टाका.   सतत एक आठवडा  हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या पायांच्या टाचा चांगल्या दिसतील.  शक्य असल्यास पायांना झोपण्याआधी हे मिश्रण लावा.

नारळाचं तेल

त्वचा मुलायम करण्यासाठी नारळाचं तेल हा चांगला आणि सोपा पर्याय आहे. नारळाचं तेल अंघोळीच्या पाण्यातही वापरलं तरी  चालतं. पाय स्वच्छ धुतल्यानंतर नारळाच्या तेलानं टाचांना हलक्या हाताने मसाज करावी. तुमच्या टाचांमधून रक्त येत असेल किंवा टाचांना सूज येत असेल तर खोबरेल तेल सूज कमी करण्यासाठी गुणकारी औषध समजलं जातं. खोबरेल तेलामध्ये अँटीमिक्रोबियल गुण असतो. त्यामुळे दोन वेळा तुम्ही हलक्या हातांनी पायांवर मसाज केल्याचा त्याचा फरक पडतो. ( हे पण वाचा- Corona virus : सावधान! चेहऱ्याला सतत हात लावण्याच्या सवयीमुळे कोरोनाला पडाल बळी...)

एलोवेरा जेल

एलोवेरा जेल त्वचेसाठी  खूप चांगलं समजलं जातं. एलोवेरा  जेलचा वापर करून तुम्ही आपली त्वचा चांगली ठेवू शकता. त्यासाठी फक्त हातांवर एलोवेरा जेल घ्या.  हलक्या हाताने पायांच्या टाचांना मसाज कर. दररोज हा प्रयोग केल्यास काही दिवसातच तुमच्या पायांच्या टाचा चांगल्या दिसायला लागतील.  सगळ्यात सोपा उपाय म्हणजे नेहमी सॉक्स वापरून आपल्या पायांना झाकून ठेवण्याच्या प्रयत्न करा. ( हे पण वाचा-Corona virus : कोरोनाच्या भीतीने पार्लरला जात नसाल, तर 'ही' सोपी ट्रिक देईल ग्लोईंग त्वचा)

Web Title: How to get relief from cracked heels by using Vaseline and Lemon myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.