सध्या कोरोनाचे रुग्ण संपूर्ण जगभरासह महाराष्ट्रात सुद्धा दिसायला सुरूवात झाली आहे.  हा आजार पसरण्याची वेगवेगळी कारणं समोर येत असताना आणखी एक धक्कादायक बाब आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यानुसार त्वचेच्या आरोग्याकडे तुम्ही योग्यप्रकारे लक्ष दिलं नाही  तर कोरोनाचे शिकार होऊ शकता. त्यासाठी बाहेर जाताना मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आुहे. कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सतत हात धुणं, खोकताना आणि शिंकताना तोंडावर रूमाल लावणं गरजेचं आहे.

 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनाईजेशनद्वारे विशेष काळजी कशी घ्यायला हवी याबाबत माहिती दिली आहे. तुम्ही  आपल्या त्वचेला सतत हात लावत असाल कोरोना व्हायरसचं इन्फेक्शन होऊ शकतं.  एका सर्वेक्षणानुसार भारतातील लोक एका तासात १६ वेळा आपल्या त्वचेला हात लावतात. तेच ऑस्ट्रोलियामध्ये २३ वेळा लोक  चेहऱ्याला हात लावतात. 

तुम्हाला सुद्धा अशी सवय असेल तर बदलायला हवी.  कारण शिंकताना  किंवा खोकताना तुम्ही आपल्या  त्वचेला हात लावत असाल तर त्यामुळे बॅक्टेरिया तुमच्या त्वचेमार्फत शरीरात प्रवेश  करू शकता.  त्यामुळे इफेक्शनचा धोका असतो. त्यामुळे कोरोना व्हायरस नाही तर अनेक गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हाला जर त्वचेला सतत हात लावायची सवय असेल तर या उपायांनी तुम्ही तुमची सवय सोडू शकता.  ट्रेनमध्ये किंवा सार्वजनीक ठिकाणी आपण वेगवेगळ्या वस्तूंना हात लावत असतो. तोच हात त्वचेवर लावल्यास आजाारांचा सामना करावा लागू शकतो.( हे पण वाचा-पांढरे केस काळे करण्यासाठी डाय लावणं सोडा, फक्त चहा पावडरमध्ये मिश्रित करा 'या' गोष्टी!)


१) तुमच्या हातांना कामात जास्तवेळ व्यस्त ठेवा.

२) त्वचेवर धुळ आल्यास  रूमाल फिरवा, सरळ हात लावू नका.

३) शिंकल्यानंतर किंवा खोकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.

४) हातांवर सॅनिटायजरचा वापर करा. (हे पण वाचा-उन्हाळ्यात तेलकट त्वचा जपण्याच्या खास टिप्स, भर उन्हातही होणार नाहीत काही समस्या!)

Web Title: Corona virus : habit of touching face It may cause corona virus infection myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.