(Image Credit : Affiliated Dermatology)

आपली त्वचा तजेलदार आणि चमकदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण हिवाळ्यात मात्र थंड हवा आपल्या त्वचेचं सौंदर्य हिरावून घेतं. अशातच काही घरगुती उपाय आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तसेच हिवाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया काही घरगुती उपायांबाबत जे हिवाळ्यात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. 

त्वचा होणार नाही कोरडी

हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे त्वचेचा ओलावा दूर होतो. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तसेच दररोज भिजवलेले 5 बदाम खा. याव्यतिरिक्त एक चमचा बेसनामध्ये लिंबाचा रस, एक चमचा गुलाब पाणी आणि चिमुटभर हळद एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्क्रब म्हणून चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने स्क्रब करत चेहरा स्वच्छ करा. 

बदामाचं तेल अधिक फायदेशीर 

रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ करून बदामाच्या तेलाने चेहऱ्यावर मालिश करा. याव्यतिरिक्त त्वचा कोमल आणि चमकदार करण्यासाठी झोपण्यापूर्वी एक चमचा ताज्या मलाईमध्ये काही थेंब गुलाब पाणी आणि 2 ते 3 थेंब लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि तसचं ठेवा. सकाळी उठल्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे दोन्ही उपाय करताना मध्ये एक दिवसाचा गॅप ठेवा.

 

हात मुलायम ठेवण्यासाठी 

हातांची त्वचा आपल्या शरीराची सर्वाधिक संवेदनशील असते. थंडीमध्ये हातांच्या त्वचेकडे आपण दुर्लक्षं करतो. अशातच हातांची त्वचा मुलायम करण्यासाठी व्हिटॅमिन ई असलेल्या क्रिम्सचा वापर करा. दिवसातून 2 ते 4 वेळा चांगल्या क्वॉलिटिचे हॅन्ड क्रिमचा वापर करा. थंडीमध्ये सौम्य हॅन्डवॉशचा वापर करा. रात्री झोपण्यापूर्वी कोमट ऑलिव्ह ऑइलने हातांना मसाज करा. 

खोबऱ्याच्या तेलाचा करा वापर 

थंडीमध्ये उद्भवणाऱ्या कोरड्या त्वचेच्या समस्येने अनेक लोक हैराण असतात. अशातच आंघोळ करण्याआधी खोबऱ्याच्या तेलाने मसाज करा. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यासोबतच त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. तसेच रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा आणि त्यानंतर कोरफडीचं जेल लावा. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. 

ओठ होतील गुलाबी आणि मुलायम 

हिवाळ्यात चेहऱ्याची त्वचा कोरडी होण्यासोबतच ओठांच्या त्वचेवरही परिणाम झाल्याचे दिसून येते. अशातच ओठांवर पेट्रोलियम जेली आणि ग्लिसरीनचा वापर करा. लिप बाम लावणंही उत्तम पर्याय असेल. याव्यतिरिक्त झोपण्यापूर्वी ओठांवर मलई किंवा ऑलिव्ह ऑइल लावणंही फायदेशीर ठरेल. नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर मोहरीचं तेल लावल्याने ओठांच्या त्वचेचा कोरडेपणा दूर होतो. थंडीमध्ये पायांच्या टाचा जास्त कोरड्या होतात. व्यवस्थित स्वच्छता न राखल्यामुळे पायांचं सौंदर्य कमी होतं. पाय काही वेळासाठी कोमट पाण्यामध्ये बुडवून ठेवून प्यूमिक स्टोनच्या मदतीने स्वच्छ करून त्यानंतर मॉयश्चराइझ करा. 

(Image Credit : World of Chemicals)

फायदेशीर ठरतं ग्लिसरीन लिंबू 

हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी काही थेंब ग्लिसरीनमध्ये लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा. दररोज सकाळी चेहरा स्वच्छ केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे चेहऱ्यावर लावा. याव्यतिरिक्त तुम्ही दही का किंवा त्वचेवर लावा. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: How to care skin and body in coming winter season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.