'या' ब्युटी टिप्स कराल फॉलो तर महागड्या प्रॉडक्ट्सना नेहमीसाठी कराल बाय-बाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 13:36 IST2019-11-07T13:27:40+5:302019-11-07T13:36:08+5:30
बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स तुम्हाला काही वेळासाठी सुंदरता देऊ शकतात, पण जास्त काळ याचा वापर करून तुम्हाला वेगवेगळ्या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागू शकतो.

'या' ब्युटी टिप्स कराल फॉलो तर महागड्या प्रॉडक्ट्सना नेहमीसाठी कराल बाय-बाय!
बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स तुम्हाला काही वेळासाठी सुंदरता देऊ शकतात, पण जास्त काळ याचा वापर करून तुम्हाला वेगवेगळ्या साइड इफेक्ट्सचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला खरंच नैसर्गिक पद्धतीने तुमचं सौंदर्य खुलवायचं असेल तर काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
जास्त फळं खा
केळी, सफरचंद, पपई, अवोकाडो, संत्री सारखी फळं जास्तीत जास्त खावीत आणि हे एकत्र करून स्किनवर फेसपॅक म्हणूनही वापरू शकता. ही फळं प्रत्येक प्रकारच्या स्किनला सूट करतात. पपईमध्ये अनेक प्रकारचे फायदेशीर एंजाइम्स असतात, हे याने स्किनवरील डेड स्किन दूर केली जाते आणि सेल रिन्यूव्हलचं काम करते. हे अर्धा तास चेहऱ्यावर लावून ठेवा.
तुमचं टोनर तुम्हीच तयार करा
ग्रीन टी पॉवरफुल अॅंटी-ऑक्सिडेंट आहे. अर्धा कप पाणी घ्या आणि गरम करा. एका वाटीत २ चमचे ग्रीन टी पावडर टाका आणि त्यात गरम पाणी टाका. थोडा वेळ हे पाणी थंड होऊ द्या. नंतर कॉटनच्या मदतीने स्किन टोनर म्हणून वापरा. काही वेळ हे स्किनवर लावून तसंच राहू द्या.
उटणं ठरतं बेस्ट स्क्रब
सर्वात चांगलं बॉडी स्क्रब उटणं आहे. ज्यात वेगवेगळे पीठ, बेसन, दही, दूधाची मलाई आणि हळदीचा समावेश असतो. हे सर्व पदार्थ मिश्रित करून शरीरावर लावा आणि आणि २० मिनिटांनी आंघोळ करा. याने तुमची डेड सेल्स दूर होतात आणि स्किन मुलायम राहते.
केसांसाठी
मॉइश्चरायजिंग हेअर मास्क तयार करण्यासाठी २ चमचे व्हिनेगर, १ चमचा ग्लिसरिन आणि एक अंड घ्या. याचं मिश्रण तयार करा. याने केसांची हलक्या हाताने मसाज करा. नंतर केसांवर प्लास्टिकची शॉवर कॅप लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवावे.
चमकदार नखांसाठी
चमकदार नखांसाठी बदाम तेल घ्या आणि गरम करा. १० मिनिटांपर्यंत आपल्या बोटांना आणि नखांना या तेलात बुडवून ठेवा. तेलाने नखांची मसाज करा. नंतर भिजलेल्या कापडाने हात पुसावे.