शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कमी वयातच म्हातारं दिसण्यासाठी कारणीभूत ठरतं 'या' पदार्थांचे सेवन ; तज्ज्ञांचा सावधगिरीचा इशारा

By manali.bagul | Published: December 21, 2020 4:36 PM

Beauty Tips in Marathi : आहारात काही पदार्थांचे अति सेवन वयवाढीच्या खुणांसाठी कारणीभूत ठरतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या अतिसेवनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा  धोका वाढतो.

वाढत्या वयात  तोंडावर सुरकुत्या येणं, वयवाढीच्या खुणा दिसणं ही समस्या उद्भवते. बदलत्या लाईफस्टाईलसह लोकांच्या आहाराची पद्धतही बदलली आहे.  दररोज व्यायाम करणं, त्वचेची काळजी घेणं, झोप घेणं शरीराला दीर्घकाळ ताजंतवानं ठेवण्यासाठी गरजेचं असतं. पण या गोष्टींबाबत जास्तीत जास्त लोक हे निष्काळजीपणा करतात. आहारात काही  पदार्थांचे अति सेवन वयवाढीच्या खुणांसाठी कारणीभूत ठरतं. आरोग्य तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार साखरेच्या अतिसेवनामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा  धोका वाढतो.

उच्च साखरयुक्त आहाराने शरीराचं नुकसान

टफ्ट्स यूनिवर्सिटीतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त साखरेच्या आहारामुळे शरीरात जास्त प्रमाणत टॉक्सिन्स तयार होतात.  या टॉक्सिन्समुळे विषारी पदार्थांना बाहेर टाकणारी शरीराची क्षमता कमी होते. अशा प्रकारे जास्त साखर असलेल्या आहाराचे सेवन केल्यास  दोन्ही बाजूंनी शरीरावर परिणाम होतो. या संशोधनाचे प्रमुख लेखक आणि टफ्टस युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ऐलन टेलर यांनी सांगितले की, ''या अभ्यासात आम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न केला की, जास्त साखरेचा आहार शरीरावर कसा वाईट परिणाम करतो. ''

थंडीच्या दिवसात तोंडावर वाफ घेण्याचे 'हे' फायदे वाचाल; तर त्वचेसह आरोग्याच्या तक्रारी कायमच्या विसराल 

जास्त साखरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यानं वाढत्या वयात आजारांचाही धोका वाढतो. उच्च साखरेच्या अन्नामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी  रोग, डायबिटीस आणि मॅक्‍युलर डीजेनेरेशनची समस्या उद्भवते. मॅक्यूलर डीजेनेरेशन हा एक आजार आहे ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला अंधत्व येते. p62 नावाचे प्रोटिन्स आपल्या पेशी निरोगी ठेवण्यासाठी शरीरात कार्य करतात. साखरेच्या आहारातमध्ये समावेश असलेले बायोप्रोडक्ट advanced glycation end products (AGEs) ला काढून टाकण्याचे कार्य करते.

शरीरात p62 जितक्या कमी प्रमाणात असेल तितकंच advanced glycation end products जास्त प्रमाणात जमा होईल. त्यामुळे शरीरातील विषारी घटकांचे प्रमाण वाढू शकते. इतकंच नाही तर शरीराचा विषारी घटकांपासून बचाव करणारी प्रणालीही प्रभावित होते. ऐलन टेलर म्हणतात, "असे नाही की शरीराला साखरेची मुळीच गरज नसते. कोणत्याही प्रकारच्या साखरेचे सेवन करणं पूर्णपणे थांबवणं देखील आवश्यक नाही. साखर आहाराऐवजी चरबीयुक्त खाद्यपदार्थ खाणं नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून नेहमी संतुलित आहार घ्या. आहारात पोषक, पौष्टिक घटकांचा समावेश करा.'' याशिवाय कमी वयातच सुरकुत्या, वय वाढीच्या खुणा दिसण्यासाठी अनियमित आहार, झोपेचा अभाव तसंच जास्त प्रमाणात साखर खाणं हे घटक प्रभावी ठरू शकतात.

हिवाळ्यात केसातील कोंडा वाढलाय? 'हे' ४ घरगुती उपाय वापराल; तर कोंडा कायमचा होईल दूर

उच्च साखरयुक्त आहार टाळण्यासाठी काही गोष्टी थांबवल्या पाहिजेत. सॉस, कॅचअप्स, पॅकेज्ड ज्यूस, कोल्ड्रिंक्स किंवा एनर्जी ड्रिंक्स, चॉकलेट दूध, ग्रॅनोला, फ्लेवर्ड कॉफी, आईस टी, सूप, प्रथिने बार, व्हिटॅमिन वॉटर यामध्ये मोठया प्रमाणावर साखर असू शकते. म्हणून दीर्घकाळ तरूण दिसण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी प्रमाणात साखरेचे सेवन करा.  

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधनExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला