Hair Care Tips Marathi : Get long hair with these home remedies | डोक्याला टक्कल पडण्याच्या समस्येनं हैराण आहात? 'या' घरगुती उपयांनी मिळवा लांब केस

डोक्याला टक्कल पडण्याच्या समस्येनं हैराण आहात? 'या' घरगुती उपयांनी मिळवा लांब केस

जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे महिलांचेच नाही तर पुरूषांनाही केस गळण्याची समस्या उद्भवते. जास्त केस गळल्यानं टक्कल पडण्याची वेळ येत. वयोमानानुसार टक्कल पडणं ही सामान्य गोष्ट आहे. पण कमी वयातच अनेकांना केस गळण्याची समस्या उद्भवते. केस गळत असतील अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो. पुरूषांमध्ये ही स्थिती अनेकदा उद्भवते. पुरूषांमध्ये टक्कल पडण्यास  हार्मोनल कारणं असू शकतात किंवा अनुवांशिकतेमुळे केसांबाबत अशी स्थिती उद्भवते. तरीही काही घरगुती उपाय वापरून तुम्ही केस गळण्याच्या समस्यांपासून सुटका मिळवू शकता.

एरंडेलचे तेल

एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आहेत. यामुळे निर्जीव झालेल्या केसांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळते. याशिवाय केसात येणारी खाज, कोंडा यांपासून आराम मिळतो. केस गळणं थांबवण्यासाठी एरंडेलच्या तेलामध्ये एक ते दोन मोठे चमचे आल्याचा रस मिक्स करा. हे मिश्रण आपल्या टाळू आणि संपूर्ण केसांना लावा. हे मिश्रण केसांवर २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा त्यानंतर शॅम्पूनं केस धुवून घ्या.

कांद्याचा रस

कांद्यामध्ये सल्फर मोठ्या प्रमाणात आढळतं. जे केसगळतीला रोखण्यासाठी मदत करतं. सल्फरसोबतच कांद्यामध्ये आयर्न आणि फायबरही असतं. तसेच व्हिटॅमिन ए, बी - 6, सी आणि ई सोबतच पोटॅशिअमही असतं. 2 चमचे खोबऱ्याच्या तेलात एक चमचा कांद्याचा रस मिश्रित करा. हे मिश्रण स्कॅल्पवर आणि केसांवर लावा. हे मिश्रण रात्रभर तसेच लावलेले ठेवा आणि सकाळी केस धुवा. यामुळे केस गळण्याची समस्या दूर होईल. तुम्हाला केसगळतीची समस्या अधिक जास्त होत असेल तर कांद्याच्या रसात दोन चमचे दही मिश्रित करा. हे मिश्रण डोक्याच्या त्वचेवर लावा. याने केसगळती कमी होईल आणि केस मुलायम होतील. 

कोरफड

कोरफड आणि खोबऱ्याच्या तेलाचे मिश्रण केसांच्या वाढिसाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं. यामुळे केस फक्त लांबच होत नाहीत तर मुलायम आणि मजबुत होतात. खोबऱ्याचं तेल आणि कोरफड एकत्र करून लावल्याने केसांच्या मुळांनाही फायदा होतो. कोरफडीमध्ये असलेले एन्जाइम्स स्काल्पवरील मृत त्वचा दूर करण्यासाठी मदत करतो. हे मिश्रण केसांचा निस्तेजपणा दूर करतं आणि केसांना मुलायम करण्यासाठी मदत करतं. कोरफडीमध्ये प्रथिनं, जीवनसत्त्व आणि खनिज तत्व मुबलक प्रमाणात असतात. जी आपल्या केसांच्या फोलिकल्सना पोषण देण्याचे काम करते. यामुळे केसांचं टेक्चर सुधारण्यास मदत होते. 

दही

दह्यामध्ये कोरफड एकत्र करून लावल्यानेही फायदा होतो. कोरफडीमध्ये प्रोटियोलिटिक एंजाइम्स (proteolytic enzymes) असतात. जे स्काल्पवरून डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठी मदत करतात. कोरफड केसांची वाढ होण्यासाठीही फायदेशीर ठरते. याशिवाय दही आणि कोरफड केस वाढविण्यासाठी, कोंडा दूर करण्याव्यतिरिक्त एक उत्तम कंडिशनर म्हणूनही काम करतं. 

हे पण वाचा-

चेहऱ्यावरील डाग आणि पिगमेंटेशन झटपट दूर करण्यासाठी 'चारोळीचा' असा करा वापर

हिवाळ्यात कोरोनाचं रौद्र रुप दिसणार; या देशात ८५ हजार मृत्यू होणार, सरकारी रिपोर्टमधून खुलासा

तुम्हीसुद्धा रिकाम्यापोटी दूध पिता का? मग निरोगी राहण्यासाठी 'या' चूका करणं टाळा

Web Title: Hair Care Tips Marathi : Get long hair with these home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.