शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

हिवाळ्यात सुंदर त्वचा मिळवण्यासाठी 'हे' फेसपॅक नक्की ठरतील फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 2:47 PM

त्वचेशी निगडीत समस्या आपल्याला नेहमीच जाणवत असतात.

(image credit- Glimgirlco.in)

त्वचेशी निगडीत समस्या आपल्याला नेहमीच जाणवत असतात. हिवाळ्यात सगळ्यात जास्त जाणवणारी समस्या ती म्हणजे त्वचा कोरडी पडणे. हिवाळ्यात  चेहरा आणि त्वचा कोरडा पडल्यामुळे त्वचा चांगली दिसत नाही. चेहरा पांढरा पडलेला असतो. यामुळे चेहर्‍याची चमक निघून चेहरा निस्तेज दिसायला लागत असतो. अनेक स्त्रिया  त्वचेचा मऊ मुलायम ठेवण्यासाठी महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतात. पण या उत्पादनामुळे त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं. महागड्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरच्याघरी काही उपायांचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा सुंदर बनवू शकता. 

आरोग्य चांगलं राहण्यासाठी किंवा उर्जा मिळण्यासाठी आपण नेहमीच आहारात फळांचा समावेश करत असतो. पण याच फळांचा वापर जर तुम्ही त्वचेसाठी केला तर कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तुमची त्वचा उजळेल. चला तर मग जाणून घेऊया कसा तयार करायचा फेसपॅक.

केळ्याचा फेसपॅक

केळ्यात मोठ्या प्रमाणात थायमिन, रिबोफ्लेबिन, नियासिन, फॉलिक एसिड सारखी पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीरासाठी गरजेची असतात. पोटाच्या अनेक विकारांवर केळी फायदेशीर आहे. केळी नियमित खाल्ल्याने पचन क्रिया सुरळीत राहते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी राखण्यासही मदत होते. त्वचेसाठी सुद्धा केळी खाणं तितकचं महत्वाचं आहे. यासाठी केळ्याचा पॅक तुम्हाला तयार करावा लागेल. (हे पण वाचा-केसांना तेल लावण्याचा काही उपयोग नाही! जर तुम्ही 'या' चुका करत असाल...)

यासाठी केळ्याला चांगलं मॅश करून घ्या. चांगलं ब्लेंड झाल्यानंतर चेहर्‍याला लावा. त्यानंतर १५ ते २० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. चेहरा धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. त्यानंतर त्वचेवर गुलाबाचं टोनर लावा. असं केल्यास त्वचेवरील काळपटपणा दूर होऊन त्वचा चमकदार दिसेल. 

सफरचंदाचा फेसपॅक

सफरचंद हा शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी करतो. सफरचंदामुळे शरीरात एक रोग प्रतिकारक यंत्र कार्यान्वित होते. सफरचंदाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्वचेसाठी सुद्धा सफरचंद महत्वाचं आहे. यासाठी सफरचंद कापून किसून घ्या. त्यात बेसनाचे पीठ घालून चेहर्‍याला लावा.  त्यामुळे  ते व्यवस्थित चिकटेल. त्यानंतर १० ते २० मिनिटांनी  कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. याप्रमाणे इतर पध्दतीने तुम्ही फेसपॅक वापरू शकता. सफरचंदाच्या रसात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून चेहर्‍यावर चोळल्यावर सावळा रंग उजळविण्यास मदत होते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स