बघणारे तुमच्याकडे बघतच रहावे असं वाटत असेल तर 'या' तीन गोष्टींचा आहारात करा समावेश!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 11:32 IST2019-11-01T11:28:38+5:302019-11-01T11:32:06+5:30
ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सोबतच तुमच्या आहारात तुम्हाला काही खास गोष्टींचा समावेशही करावा लागेल.

बघणारे तुमच्याकडे बघतच रहावे असं वाटत असेल तर 'या' तीन गोष्टींचा आहारात करा समावेश!
(Image Credit : ibtimes.co.in)
ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. सोबतच तुमच्या आहारात तुम्हाला काही खास गोष्टींचा समावेशही करावा लागेल. आजच्या धावपळीच्या जीवनामुळे आणि प्रदूषणामुळे चेहरा डल आणि निर्जिव दिसू लागतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल येऊ लागतात. जर तुम्हालाही त्वचेची चमक कायम ठेवायची असेल तर खालील टिप्स फॉलो करा.
ड्राय फ्रूट्स
ड्राय फ्रूट्स खाल्लायाने तुमची त्वचा आकर्षक आणि हेल्दी राहते. कारण यात फायबर, व्हिटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात अॅंटीऑक्सिडेंट्स असल्याने अनेक रोगांपासूनही बचाव होतो. काजू खाल्ल्याने त्वचेवर चमक येते. याने डेड आणि सुरकुत्या पडलेली त्वचा उजळून निघते. अक्रोडमधील अॅंटी-एजिंग गुण त्वचेवर नैसर्गिक चमक आणतात.
दही
दही सुद्धा त्वचेसाठी सर्वात चांगला आहार आहे. दह्यातील कॅल्शिअमने हाडे मजबूत होतात. सोबतच यात बेसन मिश्रित करून त्वचेवर लावल्याने त्वचेवरून टॅनिंगची समस्या दूर होते. स्किन सॉफ्ट होते. यातील हेल्दी प्रोबायोटिक्स बॅक्टेरिया रोगांपासूनही बचाव करतात. कॅल्शिअमसोबतच यात व्हिटॅमिन बी-२, बी-१२, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअम असतात. ही सगळीच तत्वे अन्न पचवण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्यासोबतच पोटाचे आजार जसे की, ब्लोटिंग, गॅसपासून तुमचा बचाव होतो.
शिंगाडे
शिंगाडे हे पाण्यात उगवणारं एक पौष्टिक फळ आहे. हे फळ आरोग्यासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतं. याने अनेक आजारांपासून तर सुटका मिळेतच, सोबतच त्वचेवर चमकही येते. यातील पोषक तत्व शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतात. यात अॅंटी-बॅक्टेरिअल आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. जे ग्लोइंग त्वचा मिळवण्यासाठी फायदेशीर असतात.