रिलेशनशिप टिकविण्याचे पाच मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:37 IST2016-01-16T01:07:58+5:302016-02-10T10:37:33+5:30

आजच्या युगात प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. अगदी नात्याचीसुद्धा. त्यामुळे नाते टिकविणे खूप ग...

Five ways to maintain a relationship | रिलेशनशिप टिकविण्याचे पाच मार्ग

रिलेशनशिप टिकविण्याचे पाच मार्ग

च्या युगात प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते. अगदी नात्याचीसुद्धा. त्यामुळे नाते टिकविणे खूप गरजेचे आणि अवघड झाले आहे. मग अशावेळी आपले प्रेम, आपली रिलेशनशिप टिकवायची तर कशी यासंबंधी तज्ज्ञांनी पुढील काही मार्ग सांगितले आहेत.
१. समोरच्याचा विचार करा
अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की लैंगिकदृष्ट्या सक्रिय असले म्हणजे रिलेशनशिप चांगली असते. परंतु समोरच्याचा विचार करून, त्याला विचारात घेऊनची सलगी करावी. केवळ स्वार्थासाठी किंवा हट्टापायी जोडीदाराला कुठल्याही गोष्टीसाठी भाग पाडू नका.
२. सुसंवाद हवाच
लोकांमध्ये संवाद हरवत चाललेला आहे. जोडीदाराशी छोट्यातील छोटी गोष्ट शेअर करणे, मनातील गोष्टी सांगणे, ही चांगली सवय आहे. स्पष्ट, खरे बोलल्याने नात्याची वीण घट्ट होते अन् बरेचसे गैरसमजही दूर होतात.
३. वाद वैयक्तिक पातळीवर नको
प्रत्येक जोडप्यांमध्ये वाद होतच असतात. मात्र हा वाद विकोपाल जाऊ देऊ नये. भांडण करताना मुद्याशी निगडितच बोला. उगीच जूनी उणी-दुणी काढू नका. असे केल्यास नात्याला तडा जायला वेळ लागणार नाही.
४. गृहित धरू नका
अनेक वर्षे सोबत राहिल्यावर जोडीदाराला आपण गृहित धरू लागतो. मात्र त्यामुळे नात्यामधली मजा हरवते. म्हणून मग महिन्यात एखाद्या वेळी तरी पहिल्या भेटीसारखे दिवस पुन्हा जगले पाहिजे. भेटण्याची ती हुरहुर, सोबत फिरण्याची मजा विसरून चालणार नाही.
५. आदर करा
स्वत:शी खरे राहून समोरच्याचा आदर करायला शिका. नाही तर नाते कधी वेगळे वळण घेईल कळणारसुद्धा नाही. त्यामुळे नेहमी नात्यातील ओलावा टिकून राहील याकडे लक्ष द्या. जीवनाच्या, संसाराच्या गराड्यात परस्पराविषयीचे प्रेम, आदर, काळजी विसरू नका.

Web Title: Five ways to maintain a relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.