बाहेर फिरताना किंवा सतत ट्रॅव्हल करत असाल तर धूळ आणि मातीपासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी चेहरा धुण्याऐवजी अनेकजण फेस वाइप्सचा वापर करतात. फेस वाइप्स म्हणजे सॉफ्ट आणि मुलायम टिश्यू असून ते थोडे ओले असतात. चेहरा सहज स्वच्छ करण्यासाठी सध्या अनेकजण याचाच वापर करतात. पण हे खरचं चेहऱ्याच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतं का? याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेतला तर त्यांचं स्पष्ट मत आहे की, ही पद्धत अत्यंत चुकीची ठरते. 

जास्त वाइप्सचा वापर केल्याने चेहऱ्याच्या त्वचेचं नुकसान होतं. अनेक तज्ज्ञही शक्य तेवढं फेस वाइप्सपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. 

पिंपल्स असू शकतं कारण 

अनेक लोक वेळ वाचवण्यासाठी आणि तोंड धुण्याऐवजी सर्रास फेस वाइप्सचा वापर करतात. वाइप्स तुमचा चेहरा स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. परंतु, घाणीमुळे डेड स्किन दूर करत नाहीत. याच कारणामुळे ऑयली आणि घाण पोर्सच्या आतमध्येच राहते. परिणामी पोर्स बंद होतात आणि पिंपल्सची समस्या वाढते. 

त्वचेमध्ये राहतात केमिकल्स 

तुम्ही वापर असलेल्या वाइप्समध्ये केमिकल्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अगदी सहज मेकअप काढून टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर फ्रेश ठेवण्यासाठी प्रिजरवेटिव्हचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही वाइप्सचा वापर करून चेहरा स्वच्छ करता त्यावेळी वाइप्सवर असलेले केमिकल्स चेहऱ्याच्या स्किनवर तसेच राहतात. त्यामुळे वाइप्सऐवजी चेहरा धुणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

डोळ्यांखाली सुरकुत्या पडू शकतात

डोळ्यांचा मेकअप हटवण्यासाठी वाइप्सचा वापर एक घातक उपाय आहे. डोळ्यांखालील त्वचा नाजूक असते. वाइप्समधील केमिकल्समुळे तिथे सुरकुत्या पडू शकतात. 

ड्राय स्किनची समस्या 

आपला चेहरा वाइप्सच्या मदतीने स्वच्छ केल्यानंतर चेहऱ्याची त्वचा ड्राय होऊ नये म्हणून त्यावर क्रिम लावत असाल. तर त्याचा काहीच फायदा नाही. कारण व्हाइप्समध्ये असलेलं मॉयश्चर चेहऱ्याची त्वचा शोषत नाही. त्यामुळे त्वचा कोरडच राहते. 

असा करा वापर 

लिपस्टिक हटवण्यासाठी आणि आयशॅडो हटवण्यासाठी मेकअप वाइप्सचा वापर करा. परंतु, स्किन क्लिन करण्यासाठी याचा वापर करू नका. यासोबतच मिल्क क्लिंजरचा वापर करा. जे त्वचेवरील घाण दूर करण्यासाठी मदत करतील. अन्यथा याचा वापर केल्यानंतर फेसवॉशचा वापर करा. जो चेहऱ्यावरील घाण दूर करण्यासाठी मदत करेल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)


Web Title: Five reason not to use face cleansing wips
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.