Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2017 12:23 IST2017-06-30T06:53:59+5:302017-06-30T12:23:59+5:30

प्रत्येक इव्हेंटमध्ये दीपिकाचा सांड्यामधला लूक काही औरच असतो.

Fashion: Deepika Padukone has a special favorite! | Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !

Fashion : ​दीपिका पादुकोनची या साड्यांना आहे खास पसंत !

पिका पादुकोन आपल्या किलर लुक्स आणि इंटरनॅशनल स्टाइलने हॉलिवूड आणि इंटरनॅशनल रेड कारपेट्सवर चाहत्यांना भूरळ जरी घालत आहे, मात्र ही बॅँग्लोरियन ब्यूटी सांड्यांमध्ये जेवढी सुंदर दिसते तेवढी कशातच नाही. 

Related image

दीपिकाचा डस्की लूक आणि टोन्ड बॉडी साडीमध्ये अधिक आकर्षक वाटते आणि याचे पूर्ण श्रेय जाते ते तिच्या आवडत्या विविध प्रकारच्या साड्यांना. 
काही दिवसांपूर्वी दीपिका सिएनबीसी अ‍ॅवार्डला गेली असता तिथे तिने फ्लोरल हॅँडपेंटेड साडी आणि कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज परिधान केले होते. यात ती एवढी सुंदर दिसत होती की, तिच्यावर प्रत्येकाच्या नजरा खिळल्या होत्या. दीपिकाने आपला हा एथनिक लूक स्लीक पोनीटेल, पेल पिंक लिप्स आणि विंग्ड लायनरच्या साह्याने खूपच कौशल्याने परिपूर्ण केला होता. 

Related image

दीपिकाचा हा लूक पाहून आपणास समजेल की, ती बहुतेक प्रसंगी फ्लोरल साडीच परिधान करते आणि प्रत्येक वेळी आकर्षक वाटते. दीपिकाच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या फॅब्रिक्स, पॅटरन्स आणि डिझाइन्सच्या फ्लोरल साड्याच जास्त दिसतील. त्यात हॅँडपेंटेड आणि एम्ब्रॉएडर्डपासून प्रिंटेड, फ्लोरल एम्ब्रॉएडरी, रेड फ्लोरल एम्ब्रॉएडर्ड नेट, कॉन्ट्रास्टिंग फ्लोरल ब्लाउज, गोल्डन फ्लोरल एम्ब्रॉएडरी, ब्लॅक नेट साडी, फ्लोरल एम्ब्रॉएडर्ड ब्लाउज, फ्लोरल प्रिंटेड साडी, व्हाइट फ्लोरल एम्ब्रॉएडरी साडी तसेच एप्लीक वर्क केलेल्या फ्लोरल साड्यांचा समावेश आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये दीपिकाचा सांड्यामधला लूक काही औरच असतो.  

Web Title: Fashion: Deepika Padukone has a special favorite!