Eyebrows fall out due to 5 reasons; Tips For prevent eyebrows hair loss | 'या' ५ कारणांमुळे कमी वयातच गळतात आयब्रोजचे केस; जाणून घ्या गळत्या केसांना रोखण्याचे उपाय 

'या' ५ कारणांमुळे कमी वयातच गळतात आयब्रोजचे केस; जाणून घ्या गळत्या केसांना रोखण्याचे उपाय 

आयब्रोजमुळे नेहमीच चेहऱ्याचे सौंदर्य खुलत असते. जीवनशैलीतील बदलांमुळे डोक्याच्या केसांसह आयब्रोजचे केससुद्धा गळतात. अनेकांना कमी वयातच ही समस्या उद्भवते. शरीराच्या केसांच्या तुलनेत आयब्रोजचे केस सेंसिटिव्ह असतात. इतकचं नाही तर त्या ठिकाणची त्वचा खूप नाजूक असते. यामुळेच अनेकदा आयब्रो करताना त्वचेवर जळजळ, त्वचा लाल होण्याची समस्या उद्भवते. शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर  डोक्यावरचे केस गळतात. त्याचप्रमाणे आयब्रोजच्या केसांवरही याचा परिणाम होऊ शकतो. आज तुम्हाला आयब्रोजचे केस गळण्याची कारणं सांगणार आहोत. 

पोषक घटकांची कमतरता

शरीरात वेगवेगळ्या न्यूट्रिएंट्सचे महत्व खूप आहे. आयब्रोजचे केस गळण्यामागे शरीरात पोषक घटकांची  कमतरता असणं हे कारण असू शकतं. व्हिटामीन ए किंवा जिंकचे प्रमाण कमी झाल्यास केस गळण्याचा त्रासाचा सामना करावा लागू शकतो. व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, आयर्न, ओमेगा ३ फॅट्स या घटकांच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते.

तणाव

दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक गोष्टींचा ताण येत असतो.  ताण तणाव जास्त घेतल्याने आयब्रोजचे केस  पातळ होतात. तणावामुळे शरीरात अनेक ग्रंथी काम करत नाहीत.  त्यामुळे आयब्रोच्या भागात रक्त प्रवाह कमी होतो. परिणामी केस गळायला सुरूवात होते.

त्वचेशी संबंधीत आजार

जर तुम्हाला त्वचेशी संबंधीत  कोणतेही आजार असतील तर आयब्रोजचे केस गळू शकतात.  एक्जिमा, सोसायसीस, डर्मेटायटिस  अशा समस्या अनेकांना उद्भवातत. स्किन इंन्फेक्शनमुळे त्वचेच्या पेशींना नुकसान पोहोचत असल्यामुळे खाज येणं, त्वचा लाल होणं, सूज येणं  असा त्रास जाणवतो.

गर्भावस्था

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. या बदलांमुळे आयब्रोजचे केस कमी होतात. डॉक्टरांचा योग्यवेळी सल्ला घेऊन तुम्ही वाढत जाणारी ही समस्या आटोक्यात आणू शकता.

चुकीच्या उत्पादनांचा वापर

अनेकदा ब्यूटी केअर प्रोडक्ट्स आपल्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेचे पीएच संतुलन बिघडते. परिणामी आयब्रोचे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. सौंदर्य उत्पादनांच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. या केमिकल्समुळे त्वचेचं नुकसान होते.

आयब्रोचे केस गळण्यापासून कसे रोखाल

कॅस्टर ऑईलने आयब्रोजच्या केसांची मसाज करा.

रोज रात्री झोपण्याआधी आपल्या आयब्रोच्या केसांना ऑलिव्ह ऑईल लावून झोपा.

आयब्रोजच्या केसांना कांद्याचा रस लावल्यानं इन्फेक्शन कमी होऊन वाढही चांगली होते. 

आयब्रोजना जास्त प्लकिंग करू नका. 

निरोगी आणि दाट आयब्रोजसाठी तुम्ही एलोवेरा जेलचा वापर करू शकता.

या पद्धतीने करा थ्रेडिंग

जेव्हाही तुम्ही पार्लरमध्ये थ्रेडिंग करण्यासाठी जात असाल तेव्हा काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं. थ्रेडिंग करताना भुवयांचे केस जास्त कोरू नका. त्याचप्रमाणे दोन्ही भुवयांच्यामध्ये जास्त गॅप ठेवू नका आणि भुवयांच्या दोन्ही टोकांवरून फक्त एक्स्ट्रा केसचं रिमूव्ह करा. असे केल्यानं तुमच्या भुवया परफेक्ट शेपमध्ये दिसतील. 

....म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा

भुवयांसाठी असणारी आयब्रो पेन्सिल

जर तुम्ही स्वतःच भुवयांना योग्य आकार देण्याचा विचार करत असाल तर, आयब्रो पेन्सिलचा रंग निवडताना काळजी घ्या. हा रंग तुमच्या भुवयांच्या रंगाशी मिळता जुळता असला पाहिजे. जर तुम्ही रंग निवडताना कनफ्यूज असाल तर नेहमी डार्क रंगाचीच निवड करा. जर तुमच्या भुवयांच्या केसांचा रंग ब्राऊन असेल तर त्यासाठी डार्क ब्राऊन रंगाच्या आयब्रो पेन्सिलची निवड करा. त्यामुळे भुवयांचा रंग नॅचरल दिसण्यास मदत होईल.

आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

मेकअपचा बेस लावल्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर 

मेकअप करतानाच भुवयांसाठी आयब्रो पेन्सिलचा वापर करत असाल तर, चेहऱ्यावर कंसीलर, फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करा आणि त्यानंतरच आयब्रो पेन्सिलचा वापर करा. जर पहिल्यांदा आयब्रो पेन्सिलने भुवया नीट केल्या तर फाउंडेशन किंवा कंसीलर लावताना आयब्रो पेन्सिलचा रंग पसरण्याची शक्यता असते. 

Web Title: Eyebrows fall out due to 5 reasons; Tips For prevent eyebrows hair loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.