आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

By Manali.bagul | Published: November 5, 2020 08:20 PM2020-11-05T20:20:42+5:302020-11-05T20:21:00+5:30

Skin Care Tips in Marathi : पोटावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातल्यानंतर स्ट्रेचमार्क्स चारचौघांना दिसून येण्याची शक्यता असते.

How to remove stretch marks, Take care of your skin with 7 tips given by experts | आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

आता स्ट्रेच मार्क्सची चिंता सोडा; एक्सपर्ट्सनी दिलेल्या ७ उपायांनी त्वचेची काळजी घ्या

googlenewsNext

स्ट्रेच मार्क म्हणजचे त्वचेतील चरबी वाढल्यामुळे येत असलेल्या खुणा. अनेक महिलांना साधारणपणे प्रेग्नंसीनंतर त्वचेच्या या समस्येचा सामना करावा लागतो. वजन वाढीमुळे किंवा प्रेग्नंसीनंतर  शरीरावर आलेले स्ट्रेच  मार्क्स घालवणे. हे प्रत्येक महिलेसाठी डोकेदुखी ठरत असते. स्ट्रेच मार्क घालवण्यसाठी महिला वेगवगळ्या पर्यायांचा अवलंब करत असतात.

पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर, पार्श्व भागावर अशा अनेक ठिकाणी स्ट्रेच मार्क्स येतात. त्यामुळे शॉर्ट ड्रेस घातल्यानंतर किंवा एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ड्रेस घातल्यानंतर स्ट्रेचमार्क्स चारचौघांना दिसून येण्याची शक्यता असते. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तज्ज्ञांनी दिलेल्या उपायांबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ओन्लीमाय हेल्थशी बोलताना डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर पूजा चोपडा यांनी ही माहिती दिली आहे. 

स्ट्रेचमार्क्सच्या खुणा येऊ नयेत यासाठी अशी घ्या काळजी

गर्भधारणेदरम्यान कपड्यांच्या फिटिंगकडे लक्ष द्या,  पोटाच्या खालच्या भागाजवळ घट्ट कपडे घालण्याची चूक करू नका. सुती, सैल कपडे घाला.

पाण्याच्या कमतरेमुळेही असे डाग पडतात. म्हणूनच, आपण शरीराला हायड्रेटेड ठेवल्यास या खुणा दिसणार नाहीत. यासाठी पाणी प्या, जेणेकरून त्वचेचा ओलावा कायम राहील.

आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. आपल्या आहारामध्ये प्रथिने व्हिटॅमिन सी घ्या. तसेच व्हिटॅमिन ए, सी आणि फॅटी एसिड्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश  करा. हिरव्या भाज्या खा, नियमित व्यायाम करा. 

आपल्या आहारात सोया दूध, सोयाबीन, टोफू यांचा  देखिल समावेश करू शकता. त्यांच्या मदतीने, शरीरात कोलेजेनचे उत्पादन वाढवता येते.  आपलं वजन नियंत्रणात ठेवा.

स्ट्रेचमार्क्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय

स्ट्रेचमार्क्सचे डाग घालवण्यासाठी लिंबाची साल प्रभावी ठरू शकते. यासाठी लिंबाची साल वाळवून  बारीक वाटून घ्या. आता दोन चमचे बदाम पावडर आणि गुलाबजल मिसळा. तयार पेस्ट आपल्या  खुणांवर 15 मिनिटांसाठी लावा. मग धुवा.

स्क्रबच्या मदतीनेदेखील चट्टे देखील मिटविल्या जाऊ शकतात, आपण आक्रोड किंवा जर्दाळू स्क्रब वापरू शकता. जर तुम्ही या खुणांवर 10 थेंब मेहंदी आणि दोन चमचे बदाम तेल लावले तर खुणा कमी होऊ लागतील.

आहारात व्हिटॅमिन सी असलेल्या पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. याशिवाय ओटीपोटात व्हिटॅमिन ई च्या तेलाची मालिश केल्यास चट्टेही दूर होतात. चट्टे काढण्यासाठी ऑलिव्ह ऑईल देखील खूप प्रभावी आहे. यासाठी आपल्याला ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घालावे लागतील. लॅव्हेंडर तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरेल. ...म्हणून कोरोना संक्रमण झाल्यानंतर केस गळण्याची समस्या उद्भवते, तज्ज्ञांचा खुलासा

कोरफड स्ट्रेच मार्क्स घालाविण्यासाठी फायदेशीर ठरतं. जेल वापरण्याच्या तुलनेत कोरफडीचा वापरणे जास्त चांगले. कोरफडीमधील गर काढून घेऊन स्ट्रेच मार्क्स वर लावावा. हा गर स्ट्रेच मार्क्स वर दोन ते तीन तास लावून ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने पुसा. असे केल्याने काही महिन्यात तुमचे स्ट्रेच मार्क नाहीसे होतील. चांगल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी प्रभावी ठरतं 'ड्राय ब्रशिंग'; कमी खर्चात त्वचेला 'असा' होतो फायदा

Web Title: How to remove stretch marks, Take care of your skin with 7 tips given by experts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.