कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांची काळजी आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:46 IST2016-03-26T04:46:50+5:302016-03-25T21:46:50+5:30

आपण कॉम्प्युटर व लॅपटॉपवर काम करीत असाल तर स्क्रीनवर पाहतोच.

Eye care while working on the computer requires eye care | कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांची काळजी आवश्यक

कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांची काळजी आवश्यक

शिवाय टॅबलेट किंवा स्मार्टफोनने आलेल्या ईमेलचे उत्तरही देतो. किंवा त्याच्यावर एखाद्या व्हिडीओही पाहत असतो. स्क्रिन न पाहता  या डिजिटल युगात कोणतेही काम करणे  शक्यच नाही. परंतु, या सर्वाबरोबरच डोळ्याची काळजी घेणेही खूप आवश्यक आहे. आपल्यासाठी त्याचे काही हे उपाय, दररोज आपण त्याचा वापर केला तर नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.
कॉम्प्युटर स्क्रीन व डोळ्याचे १८ ते ३० इंच अंतर ठेवावे. शिवाय आपण  जर स्क्रीनवर एंटी -ग्लेअर फिल्टर लावत असाल तर ते डोळ्यासाठी खूपच महत्वाचे आहे.
मॉनीटर हे कोणत्याही लाईटच्या खाली ठेवू नको.
 प्रत्येक २० मिनीटाला डोळे हे स्क्रीनवरुन कमीत कमी २० सेंकद तरी बाजूला करुन दुसरीकडे पाहत राहावे. तसेच प्रत्येक दोन तासाला आपल्या कामात १५ मिनीटाचे ब्रेक घ्यावे. यामुळे आपले डोळे हे स्क्रीन पासून बाजूला होतात. व त्यांना आरामही मिळतो. कॉम्प्युटर, टॅबलेट व स्मार्टफोनचा वापर करणाºयांनी प्रत्येक वर्षी आपले डोळे हे तपासून घेणे आवश्यक आहे.

Web Title: Eye care while working on the computer requires eye care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.