सोड्याचे अतिरिक्त सेवन घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 17:31 IST2016-04-06T00:31:52+5:302016-04-05T17:31:52+5:30

पाणी, शुद्ध साखर, कॅफीन, आम्ल, कृत्रिम रंग आणि पदार्थ टिकवणाºया घटकांचा समावेश असतो.

Extra intake of leaves is fatal | सोड्याचे अतिरिक्त सेवन घातक

सोड्याचे अतिरिक्त सेवन घातक

्नाचे अतिरिक्त सेवन केल्यानंतर पाण्यात सोडा टाकून पिण्याची अनेकांना सवय असते. सोडा हे जगभरातील सर्वात लोकप्रिय पेय आहे. परंतु, एक ग्लासच्यावर सोडा पाणी पिणे हे एक प्रकारे व्यसन होऊ शकते.याचा शरीरावर विपरित परिणाम होतो.

यामध्ये शून्य टक्के प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत. प्रामुख्याने पाणी, शुद्ध साखर, कॅफीन, आम्ल, कृत्रिम रंग आणि पदार्थ टिकवणाºया घटकांचा समावेश असतो. सोडा पिण्याऐवजी थोडासा ताज्या फळांचा रस घेणे कधीही उत्तम आहे. अगदी एक ग्लास पाणी सोड्यापेक्षा चांगले आहे.  सोड्यामुळे अनेकदा पोट भरल्यासारखे वाटते, यामुळे अनेकजन वजन कमी करण्यासाठी याचा वापर करतात.

मात्र वस्तुस्थिती अगदी उलट आहे. सोडा हे सर्रासपणे वजन वाढण्याचे सर्वात मुख्य कारणांपैकी एक कारण आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे प्रमाण आहे आणि त्या अनुषंगाने उष्मांकाचे प्रमाण शुन्य आहे. यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहसुद्धा होण्याची मोठी शक्यता आहे. तसेच यात कॅफीन असल्याने व्यक्तीला पुन्हा-पुन्हा सोडा प्यावासा वाटतो. कधीतरी एक ग्लास सोडा पिणे एकदम सामान्य गोष्ट आहे, पण तुम्ही  किती सोडा पित आहात खात्री करुन घ्या.

Web Title: Extra intake of leaves is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.