वजन कमी करण्यासाठी केळी खा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 21:06 IST2016-03-21T04:06:35+5:302016-03-20T21:06:35+5:30

वजन वाढण्याची समस्या ही अलीकडे अनेकांना आहे.

Eat banana to lose weight | वजन कमी करण्यासाठी केळी खा

वजन कमी करण्यासाठी केळी खा

न कमी व्हावे, याकरिता काहीजण केळीचा वापर आहारात बिलकुल करीत नाही.  केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलेरी असते. त्यामुळे वजन हे वाढू शकते. असे त्यांना वाटते. परंतु, केळी ही आपण योग्य प्रमाणातच खाल्ली तर त्यांचा कोणताच परिणाम होत नाही. गरजेपेक्षा अधिक कोणताही आहार घेतला तर त्यामुळे वजन हे वाढू शकते. याकरिता केळीला वजन वाढविण्यासाठी जबाबदार धरु नये. आपणही  वजन कमी करीत असाल व  केळी खाणे बंद केलेले
असाल तर वाचा ही माहिती.
केळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलेरी व त्यामधील फ्रकटोजमुळे साखर असू शकते. परंतु, त्याच्यासोबतच त्यामध्ये फाइबरही असते. त्याच्यामुळे हाय बल्ड शुगर नियंत्रीत राहू शकते. केळी खाण्यामुळे आपल्याला खूप एनर्जी मिळते. काम करण्याच्या १० ते १५ मिनीटे अगोदर किंवा नंतर केळी खाणे हे खूप आवश्यक आहे. यामुळे केळीमधील कार्बोहाइड्रेट्रसमुळे तुमच्या शरीराला जादा वेळीपर्यंत एनर्जी मिळते.
दररोज दिवसातून दोन केळी खाण्याचा सल्ला  दिला जातो. परंतु, आपण यापेक्षा जादा केळी खाल्ली तर आपल्या शरीरातील कॅलरीज वाढू शकते. एका मोठ्या केळीत १२० कॅलेरीज असते.
आपण जर आपल्या कॅलेरीजपेक्षा अधिक केळी खाल्ली नाही तर आपले वजन हे वाढू शकत नाही. कॅलेरीजपेक्षा अधिक केळी खाल्ली तर वजन हे वाढते. त्याकरिता कोणताही आहार हा प्रमाणातच घ्यावा.
केळीमध्ये व्हीटामिन सी, व्हीटामीन बी ६, पॉटेशिअम, फाइबर व बायोटिन असते. हे शरीरासाठी खूप पोषक आहे.

Web Title: Eat banana to lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.