स्ट्रेटनिंग करण्याआधी जाणून घ्या याचे साइड इफेक्ट, रहाल स्ट्रेटनिंगपासून दूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 12:50 IST2019-05-10T12:41:19+5:302019-05-10T12:50:48+5:30
सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल ट्राय करणे चांगली बाब आहे. पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो.

स्ट्रेटनिंग करण्याआधी जाणून घ्या याचे साइड इफेक्ट, रहाल स्ट्रेटनिंगपासून दूर!
सुंदर आणि स्टायलिश दिसण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या स्टाइल ट्राय करणे चांगली बाब आहे. पण याचा केसांवर फार वाईट परिणाम होतो. जसे की, स्ट्रेटनिंग करणे केसांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. स्ट्रेटनिंग केल्याने काही असे केमिकल्स रिलीज होतात, ज्यामुळे केस खराब होतात. केसांना स्ट्रेटनिंग करण्याचे काही साइड इफेक्ट खालीलप्रमाणे सांगता येतील.
रखरखीत केसांची समस्या
स्ट्रेटनिंगमुळे होणारं सर्वात मोठं नुकसान म्हणजे केस रखरखीत होतात. स्ट्रेटनिंग्या हीट आणि केमिकलमुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होतं. तसेच केसांची लवचिकताही नष्ट होते. याने केस रखरखीत होतात आणि गुंततात.
फिजीनेस
केस रखरखीत झाल्यावर विस्कळीत होतात. याने तुमचा लूक पूर्णपणे खराब होऊ शकतो. अशात असे केस सांभाळणंही कठीण होतं. वातावरणातही ओलावा नसेल तर केसांची स्थिती आणखी खराब होते. या अडचणीतून बाहेर येण्यासाठी कमी अंतराने स्ट्रेटनिंग करणे टाळा. केसांच्या मधे कंडीश्नर लावा. केसांना पोषण देण्यासाठी खोबऱ्याचं तेल, दूध, आणि ऑलिव्ह ऑइल लावा.
केस तुटण्याची समस्या
स्ट्रेटनिंगमुळे केस रखरखीत होतात आणि त्यामुळेच केस तुटू लागतात. केसगळतीचीही समस्या होऊ शकते. हे केमिकल आणि हीटिंग उपकरणांचा वापर केल्याने होतं. तसेच याने केस कमजोरही होतात. अशात केस सहजपणे तुटतात. त्यामुळे जास्त कंगवा फिरवणे, ड्रायरचा वापर करणे टाळा.
चमक दूर होते
स्ट्रेटनिंगमुळे केसांची खरी चमक दूर होऊ लागते. रखरखीत केसांमध्ये काही चमक राहत नाही आणि ते चांगलेही दिसत नाहीत. हे डोक्याचं नैसर्गिक तेल नष्ट झाल्या कारणाने होतं. मॉइश्चरच्या कमतरतेमुळे केस निर्जिव दिसू लागतात. केसांची चमक वाढवण्यासाठी अॅप्पल व्हिनेगर लावा.
शरीरावर जळजळ
स्ट्रेटनिंग करताना फोरमलडिहाइड गॅस निघतो आणि याने मोठं नुकसान होतं. फूड अॅन्ड ड्रग्स प्रशासनानुसार, केस मुलायम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही उत्पादनांमधून फोरमलडिहाइड गॅस निघतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा स्ट्रेटनिंग केल्याने त्वचा, डोळे, नाक आणि फुप्फुसाचं नुकसान होतं. तसेच या केमिकलमुळे नेसोफेरिंगिअल नावाचा कॅन्सर होण्याचाही धोका असतो.