पार्टी आधी हे खाऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 01:23 IST2016-03-09T08:19:48+5:302016-03-09T01:23:38+5:30

मित्रांसोबत बाहेर लेट नाईट पार्टीमध्ये अल्कोहोल (दारू) पिणार असल्यास पुढील पाच पदार्थ चुकूनही खाऊ नये. 

Do not eat it before the party! | पार्टी आधी हे खाऊ नका!

पार्टी आधी हे खाऊ नका!

ही लोकांना दारु किती घ्यावी हे कळतच नाही. सगळ्या पार्टीचा रंग ते बेरंग करून टाकतात. पार्टीची ‘जान’ होण्याऐवजी ते दुसऱ्यादिवशी हसण्याचा विषय होतात. त्यामुळे मित्रांसोबत बाहेर लेट नाईट पार्टीमध्ये अल्कोहोल (दारू) पिणार असल्यास पुढील पाच पदार्थ चुकूनही खाऊ नये. अर्थातच दुसऱ्या जर हसण्याचा विषय व्हायचे नसेल तर...

१. सॉल्टी स्नॅक्स

Popcorn

अल्कोहोल शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डिहायड्रेशन) करत असते. त्यामुळे पॉपकॉर्न, चिप्स असे खारट स्नॅक्स खाण्याच्या टाळा. मिठयुक्त पदार्थांमुळे तोंड कोरडे पडते, त्यावर दारू घेणे म्हणजे आगीतून फुफाट्यात गेल्यासारखे आहे.

२. सलाद

salad

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी जरी अतिलाभदायक असल्या तरी अल्कोहोल आगोदर सलाद खाणे म्हणजे पार्टीला उपाशी पोटी गेल्यासारखे आहे. त्यामुळे सलादमध्ये प्रोटीनयुक्त (उदा. चिकन) पदार्थ खा, जेणे करून रक्तामध्ये अल्कोहोलची पातळी वाढण्याचा वेग कमी होईल.

३. सॉय सॉस

soy sauce

वर सांगितल्याप्रमाणे पार्टी आधी मिठाचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाणे सक्तीने टाळावे. मीठ आणि सॉय सॉस तर एकमेकांचे पक्के शेजारी. अल्कोहोल आणि सॉय सॉसचे कॉकटेल झाले तर दुसºया दिवशी सर्वात वाईट हँग ओव्हरसाठी तयार राहावे लागेल.

४.फ्रेंच फ्राईज

French Fries

टेस्टी फ्रेंच फ्राईज समोर पाहून कोणालाही खाण्याचा मोह आवरता येणार नाही. पण फ्राईजमध्ये असणारे तेल तुमच्या पोटात असताना त्यावर अल्कोहोल घेणे म्हणजे उलटीला खुले आमंत्रण देण्यासारखे आहे. सो नो फ्रेंच फ्राईज!

५. स्पाईसी-तिखट पदार्थ

spicy food

स्पाईसी किंवा नाका-तोंडाला झिणझिण्या आणणारे तिखट पदार्थ सामान्यपणीच जर पोट बिघडू शकतात, तर विचार करा त्यावर दारूमुळे पोटात काय आग निर्माण होईल. त्यामुळे पार्टी आधी कोणतेच तिखट पदार्थ खाऊ नका.

Web Title: Do not eat it before the party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.