केकवरील मेणबत्ती फूक घालून विझवू नका !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:28 IST
फूक मारल्याने जीवाणू केकवरती जमा होतात.
केकवरील मेणबत्ती फूक घालून विझवू नका !
.वाढदिवस असला की केक वरती छान मेणबत्त्या सजवून नंतर त्यावर फुंकर घालून त्या विझविल्या जातात . परंतु, हे आरोग्यासाठी खूप हानीकारक आहे. एका संशोधनातून हे समोर आले आहे. केकवरती मेणबत्ती जाळणे ही कॉमन गोष्ट झाली आहे. त्यापासून काय नुकसान होते, यामुळे लोक अजूनही अनभिज्ञ आहेत. क्लेमसन युनिव्हरसिटीमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. जितक्या वेळेला आपण मेणबत्तीला फूक मारतो. तेवड्या वेळेला ते जीवाणू केकवरती जमा होतात. यामध्ये केक खाल्यानंतर ते पोटात जातात. त्यामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यापेक्षा मेणबत्ती विझविण्याची ही परंपरा समाप्त करणे आवश्यक आहे. हाताची हवी करुनसुुद्धा आपण मेणबत्ती विझवून वाढदिवस साजरा करु शकतो.