जाळीदार कपडयांनी दिसा स्टायलिश !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 16:02 IST2017-01-10T16:02:05+5:302017-01-10T16:02:05+5:30

आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी मार्केटमध्ये विविध पर्यायदेखील उपलब्ध असतात. सध्या जाळीदार कपड्यांची क्रेझ पाहावयास मिळत असून, स्टायलिश दिसण्यासाठी आपणही खालील टिप्स फॉलो करु शकता.

Dishy Stylish by Jets! | जाळीदार कपडयांनी दिसा स्टायलिश !

जाळीदार कपडयांनी दिसा स्टायलिश !

ण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी मार्केटमध्ये विविध पर्यायदेखील उपलब्ध असतात. सध्या जाळीदार कपड्यांची क्रेझ पाहावयास मिळत असून, स्टायलिश दिसण्यासाठी आपणही खालील टिप्स फॉलो करु शकता. 

* आपला लूक हटके दिसण्यासाठी क्लासिक काळ्या व पांढऱ्या रंगाऐवजी गडद रंगाचे शेड असलेले लाल, पिवळे, लाल-पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. तसेच आपणास जर अधिक बोल्ड दिसणे आवडत नसेल तर त्यांनी शांत नेव्ही ब्ल्यू किंवा बॉटल ग्रीन रंगाच्या कपड्यांची निवड करा. 

 * सध्या जंपसूटऐवजी मॅचिंग घालण्याची क्रेझ या सिझनमध्ये दिसत आहे. त्यामुळे पांढऱ्या जाळीसोबत मॅचिंग घालणे सगळ्यांनाच आवडते. फॉर्मल प्रसंगी पँट किंवा स्कर्टसोबत व कॅज्युअल प्रसंगी शॉर्टसोबत तुम्ही हे जाळीदार टॉप्स घालू शकता. 

* बहुतांश गडद रंगाचा वापर नखे किंवा ओठांसाठी वापरला जातो. मात्र पार्ट्यांमध्ये आपली वेगळी छाप पडावी म्हणून आॅक्सब्लड, फॉरेस्ट ग्रीन व नेव्ही ब्ल्यू रंगाचे कपडे परिधान करु शकता. शिवाय सुंदरसा लेस गाऊन घालून पार्टीत मिरवू शकता. 

* ग्लॅम व चिक लूकसाठी जाळीदार साडीदेखील वापरू शकता. सुंदरपणे नेसलेली अत्यंत हलकी असलेली ही साडी तुम्हाला रात्री नाचताना त्रासदायक ठरणार नाही. 
वरील टीप्सच्या साह्याने नक्कीच आपल्याला हटके लूक मिळू शकतो. 

Web Title: Dishy Stylish by Jets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.