केसगळती अन् कोड्यांपासून मिळवा नेहमीची सुटका, कढीपत्त्याचा असा करा वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 13:06 IST2019-10-21T13:06:11+5:302019-10-21T13:06:29+5:30
तणावपूर्ण लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बदललेली लाइफस्टाईल आणि प्रदूषण यामुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या होतात.

केसगळती अन् कोड्यांपासून मिळवा नेहमीची सुटका, कढीपत्त्याचा असा करा वापर!
केसगळती, केसात कोंडा होणे किंवा केस पातळ होणे या समस्या आता सामान्य झाल्या आहेत. तणावपूर्ण लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बदललेली लाइफस्टाईल आणि प्रदूषण यामुळे केसांच्या वेगवेगळ्या समस्या होतात. त्यामुळे केस चांगले करण्यासाठी तुमच्या आहारात सुधारणा करणे हे सर्वात पहिलं पाऊल आहे. अशात कढीपत्ता तुमच्या केसांच्या वेगवेगळ्या समस्या दूर करू शकतो. कढीपत्त्याने केसांना मजबूती तर मिळतेच, सोबतच केस चमकदारही होतात.
कढीपत्त्याचे फायदे
कढीपत्त्यामधील व्हिटॅमिन ही केसांच्या मुळात जाऊन मजबूती देतात आणि केसगळती कमी होते. यातील अमीनो अॅसिड केसांच्या फॉलिकल्सला मजबूत करतं. तेच बेटा-कॅरोटीन, प्रोटीन केसांचं आरोग्य चांगलं ठेवतं आणि केस चमकदार होतात. कढीपत्त्यामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल, अॅंटी-फंगल, अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे केसात होणारी कोंड्याची समस्या लगेच दूर होते.
कसा कराल वापर
- खोबऱ्याच्या तेलात ७ ते ८ कढीपत्त्याची पाने टाकून तेल कोमट करा. हे तेल डोक्याच्या त्वचेवर व्यवस्थित लावा. रात्रभर तेल तसंच केसांना राहू द्या आणि सकाळी केस पाण्याने व शॅम्पूने धुवावे.
- खोबऱ्याच्या तेलात काही कढीपत्त्याची पाने आणि ५ ते ६ मेथीचे दाणे टाकून तेल गरम करा. नंतर तेल थंड झाल्यावर केसांना लावा.
(Image Credit : beautyscara.com)
- ताजी कढीपत्त्याची पाने पेस्ट करून दह्यात टाका आणि त्यात काही ऑलिव ऑइलचे किंवा बदामाच्या तेलाचे थेंब टाका. हे मिश्रण केसांसाठी फायदेशीर ठरतं. आता ही पेस्ट केसांना व्यवस्थित लावा आणि २० ते २५ मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे.
- कढीपत्त्याची पाने भाजा आणि तुम्ही वापरता त्या हेअर ऑइलमध्ये बारीक करून मिश्रित करा. हे तेल रोज डोक्याच्या त्वचेला लावून झोपा. सकाळी केस कोमट पाण्याने धुवा.