तुमच्या 'या' सवयींमुळे पांढरे होतात तुमचे केस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 13:31 IST2018-12-21T13:30:15+5:302018-12-21T13:31:23+5:30
पांढरे केस ही आता वाढत्या वयात नाही तर कमी वयातही केस पांढरे होण्याची समस्या होत आहे. काळे आणि चमकदार केस कुणालाही हवे असतात.

तुमच्या 'या' सवयींमुळे पांढरे होतात तुमचे केस!
(Image Credit : www.businessinsider.in)
पांढरे केस ही आता वाढत्या वयात नाही तर कमी वयातही केस पांढरे होण्याची समस्या होत आहे. काळे आणि चमकदार केस कुणालाही हवे असतात. त्यामुळे अनेकजण केस काळे ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. पण तरीही जेव्हा केस पांढरे होऊ लागतात तेव्हा अनेकांचं टेन्शन वाढतं. मात्र पांढरे होणारे केस ही समस्या सोडवण्यासाठी केवळ महागडे प्रॉडक्ट वापरणे फायदेशीर ठरत नाही. काही तुमच्या सवयी सुद्धा बदलाव्या लागतात. चला जाणून घेऊ काय आहे त्या सवयी...
१) जास्त चहा-कॉफी पिणे - कॅफीनच्या अधिक सेवनामुळे केसांचं आरोग्य बिघडू शकतं. यामुळे केस वेळेआधीच पांढरे होऊ शकतात. त्यामुळे कॅफीन असलेला पदार्थांचं सेवन कमी करावं. तुम्ही चहा किंवा कॉफीऐवजी अॅंटी-ऑक्सिडेंट असलेल्या ग्रीन टी चं सेवनही करु शकता.
२) हिरव्या भाज्या न खाणे - हेल्दी डाएट तुमच्या शरीरासोबतच तुमच्या केसांचं आरोग्यही चांगलं ठेवतात. त्यामुळे तुम्हालाही मजबूत आणि चांगले केस हवे असतील तर डाएटमध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फोरस आणि फॉलिक अॅसिड असणाऱ्या फळांचं आणि भाज्यांचं सेवन करा.
३) योग्य रंगांचा वापर न करणे - जर तुम्हाला केसांना कलर करायचं असेल तर ऑइल बेस्ड हेअर डायचा वापर करावा. तेल असलेल्या डायमुळे केस अधिक चमकदार होतात. तसेच पांढरे केस होणेही याने कमी होतील. त्यासोबतच आठवड्यातून एकदा कलर प्रोटेक्टिंग शॅम्पू आणि कंडीशनरचा वापर करावा.