परीक्षेच्या काळात मुलांना ताण देऊ नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 09:38 IST2016-03-16T16:38:35+5:302016-03-16T09:38:35+5:30

. चांगले गुण मिळविण्यासाठी घरातील अनेकजणांचा त्यांच्यावर दबाव असतो.

Children should not be stressed during the test | परीक्षेच्या काळात मुलांना ताण देऊ नये

परीक्षेच्या काळात मुलांना ताण देऊ नये

 
ा दबावामुळे उलट त्यांचे नुकसान होऊ शकते. या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.

 परीक्षेच्या काळात उलट त्यांना कोणताही ताण न देता संपूर्ण आठ तास झोप घेऊ द्यावे.  ताण दिला तर त्यांना टेन्शन येऊन झालेला अभ्यासही ते विसरतात. त्यांना या काळात कोणतीही कमतरता भासणार नाही, याची आपण काळजी घेणे आवश्यक आहे. चांगले गुण मिळविण्यासाठी परीक्षेच्या अगोदरपासूनच वेळापत्रकानुसार  त्यांच्याकडून अभ्यास करुन घ्यावा. परीक्षेच्या काळात त्यांच्यावर दबाव न आणता त्यांचा आहारही उत्तम ठेवावा. आरोग्याच्या कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. आहारात फळे व भाज्यांचा समावेश असावा, त्यामुळे एकाग्रता राहते. मुलांनेही  या काळात घरासह अन्य कोणताच ताण घेऊ नये. ताणतणावामुळे एकाग्रता राहत नाही. तसेच कुणासोबत वाद होईल, असेही वागू नये. कारण की, परीक्षेचा काळ हा मुलांसाठी खूपच उपयुक्त असते. त्यावर त्यांचे संपूर्ण जीवन अवलंबून असते. घरातील कुणीही त्यांच्यावर  जादा गुण  मिळविण्याचा दबाव आणू नये.

Web Title: Children should not be stressed during the test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.