डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2018 12:03 IST2018-03-27T11:35:40+5:302018-06-23T12:03:07+5:30

हळदीत आढळणा-या अ‍ॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो.

Blurred brittle skin is useful! | डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!

डागरहित उजळ त्वचेसाठी हळद उपयुक्त!

द जेवढे आरोग्यदायी तेवढेच सौंदर्यवर्धकही आहे.हळदीत आढळणा-या अ‍ॅन्टिसेप्टिक गुणांमुळे त्वचेच्या सौंदर्यात मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याने हळदीचा वापर उपयुक्त ठरतो. जाणून घेऊया डागरहित उजळ त्वचेसाठी हळदीचे गुणकारी फेस पॅकची उपयुक्तता... 

* हळद आणि दही 
एक चमचा हळद पावडर, एक चमचा दह्यासोबत मिक्स करा आणि ही पेस्ट चेहºयावर लावा. पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. आठवड्यातून एकदा तरी हे पॅक वापरा. डाग नक्की साफ होतील.

* हळद आणि काकडीचा रस 
हळद आणि काकडीने त्वचा उजळेल. यासाठी एक चमचा हळदीत दोन चमचे काकडीचा रस मिसळा आणि चेहºयावरील डागांवर लावा. पेस्ट वाळल्यावर चेहरा धुऊन टाका. असे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा.  

* हळद आणि लिंबाचा रस 
ताज्या लिंबाच्या रसात चिमूटभर हळद मिसळा आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही चेहºयावर लावून पंधरा मिनिट राहून द्या. नंतर चेहरा धुऊन पुसून घ्या आणि मॉइस्चराइजर लावा.

* हळद आणि चंदन पावडर
एक चमचा चंदन पावडरमध्ये चिमूटभर हळद आणि जरासं मध मिसळा. चेहºयावर २० मिनटांसाठी लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. 

* हळद, दूध आणि मध
दोन चमचे दूध आणि एक चमचा मधासोबत एक चमचा हळद मिसळा. ही पेस्ट चेह-यावर लावा आणि पंधरा मिनिटानंतर चेहरा धुऊन टाका. याने हळू-हळू चेहºयाचे सर्व डाग दूर होतील.  

Web Title: Blurred brittle skin is useful!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.