त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ट्राय करा बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:55 IST2019-10-17T12:55:13+5:302019-10-17T12:55:47+5:30

बदलतं वातावरण आणि वाढणारं प्रदूषण यांमुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सचा आधार घेण्यात येतो.

Besan face packs to have fair and glowing skin | त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ट्राय करा बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक

त्वचा चमकदार आणि मुलायम करण्यासाठी ट्राय करा बेसनाचे 'हे' 5 फेसपॅक

(Image Credit : stylesatlife.com)

बदलतं वातावरण आणि वाढणारं प्रदूषण यांमुळे अनेकदा त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठी बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा किंवा महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्सचा आधार घेण्यात येतो. पण काही फायदा होत नाही. अनेकदा तर या उत्पादनांच्या वापरामुळे त्वचेला आणखी नुकसान पोहोचतं. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना माहीत नसतं की त्वचेच्या अनेक समस्यांवरील उपाय हे आपल्या स्वयंपाकघरातच असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरातच तयार करण्यात येणाऱ्या बेसनाच्या पाच फेसपॅक्सबाबत सांगणार आहोत. 

ऑयली स्किनसाठी फायदेशीर... 

एका बाउलमध्ये चार चमचे बेसन घ्या आणि यामध्ये अर्ध लिंबू आणि तीन चमचे गुलाब पाणी एकत्र करा. शक्य असेल तर यामध्ये दहीदेखील एकत्र करू शकता. तयार मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी स्वच्छ धुवून टाका. हा फेसपॅक चेहऱ्यावरील तेलकटपणा शोषून घेतो आणि पोर्स क्लीन करण्यासाठी मदत करतो. त्याचबरोबर लिंबू आणि दही चेहऱ्याचा रंग उजळवण्यासाठी मदत करतो. 

ड्राय स्किनसाठी गुणकारी... 

बाउलमध्ये चार चमचे बेसनासोबत एक चमचा बदामाचं तेवल किंवा खोबऱ्याचं तेल एकत्र करा. त्याचबरोबर यामध्ये एक चमचा गुलाबपाणी एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्याव लावा आणि 10 मिनिटांनी हलक्या गरम पाण्याने धुवून टाका. दररोज हा फेसपॅक लावल्याने आठवड्यातच तुमची स्किन मुलायम आणि ग्लोइंग होइल. 

अ‍ॅक्ने आणि पिंपल्सची समस्या करेल दूर 

अ‍ॅक्ने आणि पिंपल्सची समस्या लूक बिघडवते. यापासून सुटका मिळवण्यासाठी बेसन मदत करतं. एका बाउलमध्ये दोन चमचे बेसन, दोन चमचे चंदनाची पावडर, एक चमचा लिंवू आणि चिमूटभर हळद एकत्र करून फेसपॅख तयार करा. तयार पॅक चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. दररोज हा फेसपॅक लावा. काही दिवसांतच तुमच्या त्वचेवरील पिंपल्स आणि अ‍ॅक्ने दूर होतील.


 
अ‍ॅन्टी एजिंग 

बेसनाच्या मदतीने वाढत्य वयाची लक्षणं रोखण्यासाठीही मदत मिळते. त्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा बेसन, एक चमचा फ्रेश क्रिम, दोन चमचे गुलाब पाणी आणि एक चिमुटभर मीठ लावा. हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून चेहऱ्यावर लावा. फॅक सूकल्यानंतर हलक्या कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या आणि त्यानंतर क्रिम अप्लाय करा. 

उजळ त्वचेसाठी 

त्वचेचा रंग उजळवण्यासाठी एका बाउलमध्ये एक चमचा बेसन आणि टोमॅटोचा गर एकत्र करा. त्यानंतर एक चमचा लिंबाच रस एकत्र करून तयाप फेसपॅक चेहऱ्यावर 20 मिनिटांसाठी लावा. दररोज हा फेसपॅक लावल्याने एका आठवड्यात चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होइल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Besan face packs to have fair and glowing skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.