त्वचेवर पुळ्या आणि काळपटपणा येण्याची समस्या खूपच सामान्य आहे. सगळ्याच महिलांना पिंपल्सची समस्या सतावत असते. प्रदुषणामुळे स्किनचा रंग काळा पडून वेगवेगळ्या प्रकराच्या एलर्जीचा सुद्धा सामना करावा लागतो. जर तुम्हाला सुद्धा त्वचेचा रंग उजळदार हवा असं वाटत असेल तर कोणत्याही केमिकल्सचा वापर न करता तुम्ही घरच्याघरी एका पदार्थांचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकता. 

दुधाची साय  ही आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरत असते. दुधाच्या साईतून निघणारे तूप शरीरासाठी आणि त्वचेसाठी सुद्धा खूप लाभदायक ठरत असतं. आज आम्ही तुम्हाला दुधाच्या सायीचा वापर करून त्वचा कशी सुंदर करता येईल हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊन दुधाच्या  सायीचा वापर कसा करायचा.


त्वचेचा कोरडेपणा हटवण्यासाठी

जर तुमची त्वचा कोरडी पडली असेल तर दुधाची साय त्वचेवर लावल्यास समस्या दूर होण्यास मदत होईल. दोन चमचे दुधाच्या सायीत चार ते पाच थेंब  तेल आणि एक चमचा मध घाला. त्यानंतर हे मिश्रण मिक्स करून आपल्या चेहरा आणि मानेला लावा.  हा लेप सुकल्यानंतर चेहरा २० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. पण चेहरा पाण्याने धुण्याआधी टोनरचा वापर करा. या प्रयोग तुम्ही २ आठवडे रोज केलात तर त्वचेचा काळपटपणा दूर होईल.

ग्लोईंग त्वचेसाठी

एक टेबलस्पून बेसन आणि २ चमचे साय एकत्र करून त्यात बदामाचं तेल घाला. हे मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याची पेस्ट लावून त्वचेला मसाज करा. हे मिश्रण त्वचेवर चांगल्या पध्दतीने मुरू द्या. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवून टाका. त्यानंतर त्वचेवर मॉईश्चराईजर लावा. असे केल्याने त्वचा  चमकदार दिसेल. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

Image result for milk cream
काळपटपण आणि सुरकूत्या दूर करण्यासाठी

दोन टेबलस्पून सायीत एका लिंबाचा रस, गुलाबपाणी तसंच एलोवेरा जेल घाला. त्यानंतर शरीराच्या ज्या भागावर  टॅनिंग झालं आहे. त्याठिकाणी हे मिश्रण लावा. अर्ध्या तासानी हा पॅक धुवून टाका. किंवा कापसाचा तुकडा ओला करून चेहरा पुसून घ्या. हा प्रयोग केल्यास तुम्हाला त्वचेवर फरक दिसून येईल. तसंच दुधाची साय लिंबाच्या रसात मिसळून लावल्यास तुमच्या त्वचेवरील मृतपेशी निघून जाण्यास मदत होते. सायीचा वापर तुम्ही रोज फेसस्क्रब म्हणूनही करू शकता. त्यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन असल्याने चेहऱ्यावर सुरकूत्या येण्यापासून रोखतात. ( हे पण वाचा-केसगळती थांबवण्यासाठी आणि सुंदर केस मिळवण्यासाठी मोहरीच्या तेलाने करा मालिश, जाणून घ्या पद्धत...)

पिंपल्स घालवण्यासाठी

तुमच्या त्वचेवर असलेले डाग, मुरुम घालवून तुम्हाला सुंदर, कोमल  त्वचा हवी असेल तर दुधाची साय तुम्ही चेहऱ्याला लावू शकता त्यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही. त्वचेवर तुम्ही रोज सकाळी दुधाची साय नुसती लावली तरीही तुमची त्वचा मुलायम होण्यास मदत होते. सायीमध्ये स्निग्ध असल्यामुळे स्क्रिनला मॉईचर करण्यासाठी मदत होते. परंतु ज्यांची त्वचा तेलकट आहे अशांनी नुसती साय लावू नये. अति तेलामुळेही त्वचेवर मुरुम किंवा फोड येतात. ( हे पण वाचा-केसांच्या एकापेक्षा जास्त समस्या दूर करण्यासाठी वापरा मुलतानी माती, मग बघा कमाल)

Web Title: Benefits of malai face packs for fair and soft skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.