(Image Credit : eaglemedia.co.za)

हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि ड्रायनेसमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच थंडीत जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम ठेवायचे असेल तर तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक आहे. अनेकदा हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला देण्यात येतो. तसेच त्यानंतर त्वचेला मॉयश्चरयाझरही लावण्यास सांगितले जाते. पण त्वचेची काळजी घेण्यासाठी एवढंच पुरेसं आहे असं नाही. त्यासाठी संतुलित आहारासोबतच त्वचेसाठी योग्य स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करणं गरजेचं असंत. 

असं असावं बॉडी लोशन

हिवाळ्यात वाहणारी शुष्क हवा सर्वात आधी त्वचेतील ओलावा नष्ट करते. या वारावरणात चेहऱ्यावरच नाहीतर संपूर्ण शरीरावर चांगल्या बॉडी लोशनचा किंवा मॉयश्चरायझरचा वापर करणं आवश्यक असतं. बॉडी लोशन त्वचेसाठी एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतं. परंतु वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडी लोशनचा वापर करणं आवश्यक असतं. जर स्किन ड्राय होत असेल तर अशा बॉडी लोशनचा वापर करा ज्यामध्ये दूध आणि ग्लिसरीन मुबलक प्रमाणात असेल. 

या गोष्टींचा वापर करणं टाळा 

हिवाळा सुरू झाला की, लोक गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करतात. पण लक्षात ठेवा की, पाणी जास्त गरम असू नये. जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने स्किन जास्त ड्राय होते. तसेच थंडीत साबणाचा वापर करणं टाळा. तसेच उन्हाळ्यात वापरले जाणारे स्क्रबही वापरू नका. बाजारात अनेक विंटर स्पेशल स्क्रब उपलब्ध असतात. त्यांचा वापर तुम्ही करू शकता. जर तुमची त्वचा ऑयली असेल तर स्क्रबचा वापर करू शकता. परंतु आठवड्यात एकदा किंवा दोन वेळा स्क्रबचा वापर करा. 

असा तयार करा फेसमास्क 

हिवाळ्यात तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने फेसमास्क तयार करू शकता. बाजारातील केमिकलयुक्त मास्कऐवजी घरगुती मास्क त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ड्राय स्किनसाठी तुम्ही बेसनाचा फेसमास्क तयार करू शकता. कसा तयार करावा फेसमास्क जाणून घेऊया... 

बाउलमध्ये चार चमचे बेसनासोबत एक चमचा बदामाचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल एकत्र करा. त्याचबरोबर यामध्ये एक चमचा गुलाबपाणी एकत्र करा. तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी हलक्या गरम पाण्याने धुवून टाका. दररोज हा फेसपॅक लावल्याने आठवड्यातच तुमची स्किन मुलायम आणि ग्लोइंग होइल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Beauty Tips winter skin care tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.