Beauty tips pudina and gulab jal face pack for skin care or healthy skin | बदलत्या वातावरणात पुदिना आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक वापरा; सर्व समस्या दूर करा
बदलत्या वातावरणात पुदिना आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक वापरा; सर्व समस्या दूर करा

(Image Credit : Stylecraz)

सध्या वातावरणात हळूहळू बदल घडून येत आहेत. दुपारचं ऊन त्वचेला नुकसान पोहोचवतं. एवढचं नाहीतर सकाळचा वाराही त्वचा कोरडी होण्यासाठी कारणीभूत ठरतो. जर तुम्हीही बदलणाऱ्या वातावरणात अशा समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हाला फक्त तीन गोष्टींचा वापर करावा लागेल आणि सर्व समस्या चुटकीसरशी दूर होतील. या गोष्टींचा वापर केल्याने त्वा फक्त याच वातावरणात नाहीतर येणाऱ्या थंडीमध्येही ड्रायनेस आणि डेड स्किन सेल्सपासून दूर राहिल. 

असा तयार करा फेसपॅक 

तुम्हाला त्वचेची काळजी घेण्यासाठी पुदिन्याची पानं, गुलाब पाणी आणि ग्लिसरीनची गरज आहे. ग्लिसरीन आणि गुलाब पाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. तसचे पुदिन्याची पानं गरज असेल तेव्हा भाजी बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होता. तसेच तुम्ही तुमच्या किचन गार्डनमध्ये पुदिना लावू शकता. 

असा तयार करा फेसपॅक : 

ग्लोइंग, हेल्दी आणि फ्लॉलेस त्वचेसाठी पुदिन्याची हिरवी पानं धुवून वाटून घ्या. वाटून घेण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करा. पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये दोन थेंब ग्लिसरीन एकत्र करा. आता तयार पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटांनी धुवून टाका. जर तुम्ही नियमितपणे या फेसपॅकचा उपयोग करणार असाल तर चेहऱ्यावरील अॅक्नेच्या समस्या दूर होतील. तसेच डेड आणि ड्राय स्किन सेल्सच्या समस्याही दूर होण्यास मदत होईल. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Beauty tips pudina and gulab jal face pack for skin care or healthy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.