शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

या 6 घरगुती उपायांनी मिळवा केसातील कोंड्यापासून सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 10:42 IST

यावर भरमसाठ पैसा खर्च न करता घरगुती उपायांनीही मात करता येऊ शकते. काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पहा.

केसात कोंडा होणे ही समस्या अनेकांमध्ये बघायला मिळते. केसात कोंडा होणे ही एक गंभीर समस्या असून याकडे दुर्लक्ष करणे फारच चुकीचं ठरेल. ही अगदी समस्या  सामान्य वाटत असली तरीही त्यांवर वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्यामुळे काही त्वचाविकार उद्भवण्याची शक्यता असते. यावर उपचार म्हणून बाजारातून महागडी उत्पादने विकत घेतली जातात. पण यावर भरमसाठ पैसा खर्च न करता घरगुती उपायांनीही मात करता येऊ शकते. काही महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्स घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून पहा.

1) कडूलिंब - पाव कप कडूलिंबाचा रस, नारळाचं दूध व बीटाचा रस एकत्र करून त्यात चमचाभर नारळाचं तेल एकत्र करून टाळूवर मसाज करावा. 20 मिनिटांनी केस हर्बल शाम्पूने धुवावेत. हा प्रयोग आठवड्यातून दोनदा केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

2) लिंबू - यामध्ये व्हिटामिन सी आणि अ‍ॅसिड अधिक प्रमाणात असल्याने कोंड्याची समस्या दूर करण्यास मदत होते. त्यामुळे लिंबाची फोड थेट टाळूवर 10-15 मिनिटे चोळावी. नंतर शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

3) बेकिंग सोडा - हा अल्कलाईन असल्याने टाळूवरील मृत पेशी काढून टाकण्याची क्षमता त्यात आहे. त्यामुळे कोमट पाण्याने केस धुताना बेकिंग पावडर पाण्यात मिसळून जाडसर पेस्ट बनवावी. व टाळूवर हलका मसाज करावा. त्यानंतर नेहमीच्या शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत.

4) कोरफडीचा गर - कोरफडीचा गर थंड आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल असल्याने कोंड्याची समस्या कमी होते. मात्र हा गर लावताना केसांना तेल नाही याची काळजी घ्या. केस धुताना सौम्य शाम्पू किंवा पाण्याचा वापर करा.

5) मेथीचे दाणे - 2 चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट बनवून चमचाभर अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमध्ये मिसळावे. हे मिश्रण 30 मिनिटे केसांवर लावून ठेवावे. नंतर एखाद्या सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवावेत. 

6) रिठा - रात्रभर 10-15 रिठा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी या रिठ्याची पावडर तयार करा. रिठा पावडर पाण्यात उकळून गाळून घ्या. त्यामध्ये आवळ्याची पावडर किंवा रस मिश्रित करा आणि तयार मिश्रण टाळूवर हलक्या हाताने लावा. अर्धा तासाने ही पेस्ट सौम्य शाम्पूने स्वच्छ धुवावी. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHealthआरोग्य