शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

आलिया, जान्हवी आणि सारासारख्या त्वचेसाठी वापरा 'या' टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 14:17 IST

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात.

बॉलिवूड अभिनेत्रींच्या सौंदर्याची जगभरात नेहमीचं चर्चा होत असते. अनेकदा तर त्यांच्या अभिनयापेक्षाही त्यांच्या सौंदर्यामुळे त्या ओळखल्या जातात. प्रत्येक वर्षी बॉलिवूडमध्ये अनेक नवख्या अभिनेत्री डेब्यू करतात. आपला अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर त्या अनेक चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनतात. यामध्ये सर्वात जास्त समावेश स्टार किड्सचा असतो. स्टार किड्स असूनही त्या आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनात स्थान निर्माण करतात. 

2012मध्ये मुकेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये जोरदार एन्ट्री केली होती. 2018मध्ये दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि तिच्याच पाठोपाठ सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये धमाकादार एन्ट्री केली. लवकरच शाहरूख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. या सर्व स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधीच प्रसिद्ध होत्या. कारण यांचे आई-वडिल सुपरस्टार आहेतच, पण खरं तर त्यांची फॅशन स्टाइलही धमाकेदार आहे. 23 ते 28 वयोगटातील या अभिनेत्री सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असतात. तुम्हाला हे ऐकून कदाचित धक्का बसेल की, या चारही अभिनेत्री आपलं सौंदर्य वाढविण्यासाठी फक्त घरगुती उपायांनाच प्राधान्य देतात. जाणून घेऊया या चौघींच्या ब्युटी सिक्रेट्सबाबत...

 आलिया भट्ट

मुकेश भट्ट यांची मुलगी आलिया भट्टने 2012मध्ये 'स्टूडंट ऑफ दि ईयर' या चित्रपटातून पदार्पण केले. आपल्या पहिल्या चित्रपटातूनच आलिया करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत बनली होती. 

आलिया भट्टचे ब्यूटी सीक्रेट्स :

1. एका इंग्रजी मासिकातून दिलेल्या इंटरव्यूमध्ये आलियाने सांगितले की, दिवसभर काम केल्यानंतर जेव्हा ती घरी पोहोचते. तेव्हा सर्वात आधी ती आपला मेक्प व्यवस्थित रिमूव्ह करते. त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर बर्फ लावते. 

2. स्किन केयर रूटीनसाठी ती मुलतानी माती आणि कच्च्या दूधाचा वापर करते. स्किन आतून हायड्रेट करण्यासाठी ती मुबलक प्रमाणात पाण्याचे सेवन करते. 

3. केसांची काळजी घेण्यासाठी ती केसांना तेल लावते. तसेच एक दिवसाआड हेयर वॉश करते. 

जान्हवी कपूर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने या वर्षी 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात डेब्यू केला. चित्रपटामध्ये तिच्यासोबत अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टर होता. मराठी चित्रपटाचा रिमेक असलेल्या या चित्रपटाने ईशानचा अभिनय आणि जान्हवीच्या सौंदर्याच्या जोरावर लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 

जान्हवी कपूरचे ब्यूटी सीक्रेट्स :

1. आलिया भट्टप्रमाणेच जान्हवी कपूरही घरी परतल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप व्यवस्थित स्वच्छ करते. 

2. स्किन तजेलदार ठेवण्यासाठी जान्हवी बदामाचं तेल आणि व्हिटॅमिन-सी सीरमचा वापर करते. 

3. स्किम हायड्रेट करण्यासाठी जान्हवी वेळोवेळी मॉयश्चरायझरही अप्लाय करते. 

सारा अली खान

सैफ अली खानची मुलगी सारा अली खाननेही याच वर्षी 'केदारनाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर सुपरस्टार रणवीर सिंहसोबतचा दुसरा चित्रपट सिम्बा 28 डिसेंबरला रिलिज होणार आहे. आपल्या पहिल्या चित्रपाटमधूनच सारा अली खानने फॅन्सच्या हृदयात आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे. 

सारा अली खानचे ब्यूटी सीक्रेट्स :

1. सुंदर त्वचा मिळवण्यासाठी सारा जेवढं शक्य असेल तेवढ्या पाण्याचं सेवन करते. पाणी त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतं. तसेच त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी मदत करतं. 

2. साराच्या तजेलदार त्वचेचं रहस्य म्हणजे दररोज वर्कआउट करणं, सारा कधीही वर्कआउट मिस करत नाही. 

3. जर एखादा इव्हेंट किंवा चित्रपाटचं शूट असेल तर सारा दिवसभर मेकअप न करता राहते. अधिक मेकअप न करणं आणि कॉस्मॅटिक्सच्या केमिक्लपासून लांब राहणं साराच्या सौंदर्याचं आणखी एक रहस्य आहे. 

सुहाना खान

बॉलिवूडचा किंग खान असलेल्या शाहरूख खानची मुलगी सुहाना खान आपलं सौंदर्य आणि फिटनेससाठी नेहमीच चर्चेत असते. सुहानाने अजुनपर्यंत बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेला नाही. परंतु मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच सुहानाही बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. सुहाना सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. 

सुहानाचे ब्युटी सीक्रेट्स :

1. पौष्टिक डाएट हे सुहानाच्या ग्लोइंग स्किनचं आणि फिटनेसचं रहस्य आहे. 

2. डाएटमध्ये सुहाना दररोज डाळ आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करते. त्यामुळे त्वचा नैसर्गिक पद्धतीने उजळण्यासाठी मदत होते. 

3. त्वचा हायड्रेट करण्यासाठी सुहाना पाण्याचं अधिक सेवन करते. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सbollywoodबॉलिवूडSara Ali Khanसारा अली खानJanhavi Kapoorजान्हवी कपूरAlia Bhatआलिया भटSuhana Khanसुहाना खानCelebrityसेलिब्रिटी