अ‍ॅन्टी-एजिंग क्रिममुळे नाहीतर 'या' सवयी सोडल्याने त्वचा राहील तरूण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 11:11 AM2019-10-14T11:11:19+5:302019-10-14T11:11:58+5:30

तुम्ही त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी अ‍ॅन्टी-एजिंग क्रिमचा वापर करताय का? फार कमी वयातच वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे त्वचेचं तारूण्य हिरावलं जातं. एजिंग स्किनच्या समस्यांपासून सुटका करून घेणं अत्यंत अवघड असतं.

Beauty anti ageing habits that can scar youthfulness | अ‍ॅन्टी-एजिंग क्रिममुळे नाहीतर 'या' सवयी सोडल्याने त्वचा राहील तरूण

अ‍ॅन्टी-एजिंग क्रिममुळे नाहीतर 'या' सवयी सोडल्याने त्वचा राहील तरूण

googlenewsNext

तुम्ही त्वचेचं तारूण्य जपण्यासाठी अ‍ॅन्टी-एजिंग क्रिमचा वापर करताय का? फार कमी वयातच वाढत्या वयाच्या लक्षणांमुळे त्वचेचं तारूण्य हिरावलं जातं. एजिंग स्किनच्या समस्यांपासून सुटका करून घेणं अत्यंत अवघड असतं. अ‍ॅन्टी-एजिंग क्रिमचा वापर करून तुम्हाला ही लक्षणं काही वेळासाठी लपवता येतात. पण यापासून कायमची सुटका करणं अशक्यच असतं. ही समस्या जर दूर करायची असेल तर त्यासाठी लाइफस्टाइलमध्ये काही बदल करणं आवश्यक असतं. आज आम्ही चार अशीच कारणं सांगणार आहोत. जी एजिंगची समस्या वाढवतात. जर तुम्ही या सवयी बदलल्या तर त्वचेचं तारूण्य आणि सौंदर्य जपण्यासाठी मदत होइल. 

स्क्रिन टाइम कमी करा

सध्या स्किन एजिंगचं मुख्य कारण स्क्रिन टाइम जास्त असणं ही आहे. ज्या व्यक्ती जास्त वेळ निळ्या प्रकाशात राहतात. त्यांची त्वचेवर एजिंगच्या समस्या उद्भवत आहेत. मोबाइल, लॅपटॉप, डेस्कटॉपमधून निघणारी किरणं सूर्याच्या किरणांपेक्षा त्वचेला जास्त नुकसान पोहोचवतात. त्यामुळे स्क्रिन टाइम कमी करणं आवश्यक आहे. 

स्मोकिंग कमी करा 

त्वचेवर वाढणारी वाढत्या वयाची लक्षणं आणि सुरकुत्या यांचं सर्वात मोठं कारण म्हणजे, धुम्रपान किंवा स्मोकिंग करणं हे आहे. जर तुम्ही जास्त स्मोकिंग करत असाल तर तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सिगारेट प्यायल्याने त्वचेची ऑक्सिजन लेव्हल कमी होते. 

सनस्क्रिन न लावणं 

जेव्हाही स्किन केअरबाबत बोललं जातं त्यावेळी सनस्क्रिन अत्यंत आवश्यक असल्याचे आपल्याला सांगितले जाते. बाहेर पडण्याआधी सनस्क्रिन लावणं विसरत असाल तर तुम्ही स्वतःच्या त्वचेचं नुकसान करत आहात. सनस्क्रिन सूर्याच्या प्रकाशापासूनच नाहीतर प्रदूषणापासूनही तुमचा बचाव करतात. 

शार्ट टेम्पर्ड

ज्या व्यक्ती शॉर्ट टेम्पर्ड असतात, त्यांच्यामध्ये एजिंगच्या समस्या फार लवकर दिसून येतात. असं एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. सतत चिडचिड केल्याने त्वचेला पोषण देणारे हार्मोन्स प्रभावित होतात. हे एक प्रकारच्या मानसिक संतुलनाची गोष्ट आहे. जर तुम्ही सतत चिडत असाल तर तुम्हालाही एजिंगच्या समस्येचा सामना करावा लागेल. त्यामुळे आजपासूनच चिडचिड करणं कमी करा.

 

मेकअपचा अधिक उपयोग करा 

महिलांमध्ये स्किन एजिंगचं मुख्य कारण मेकअप अधिक करणं हे आहे. जर तुम्हीही जास्त वेळ मेकअप करत असाल तर तुम्ही तुमच्या त्वचेचं नुकसान करत आहात. गरजेपेक्षा जास्त मेकअप आणि बराच वेळ मेकअपचा वापर करणं ठिक नाही. 

(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)

Web Title: Beauty anti ageing habits that can scar youthfulness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.