मुलांच्या जन्मानंतर व्हा मानसिक सुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:35 IST2016-01-16T01:13:46+5:302016-02-07T06:35:44+5:30

९0 टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो.

Be happy after the birth of a child | मुलांच्या जन्मानंतर व्हा मानसिक सुखी

मुलांच्या जन्मानंतर व्हा मानसिक सुखी

९0
टक्के दाम्पत्य मुले झाल्यानंतर चिडचिड करू लागतात. अनेक महिलांना मुलाला जन्म दिल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच पुरुषांच्या स्विंग मूडलाही झेलावे लागते. या नव्याने निर्माण झालेल्या समस्यांमुळे संसारातील गोडवा कमी व्हायला लागतो. एका सर्वेक्षणाअंती ही बाब समोर आली आहे. खरंतर नवीन झालेले बदल त्यांच्या तब्येतीवर परिणाम करतात. तसेच त्यांच्या लग्नात अनेक अडचणी निर्माण करतात. कारण भांडणे करण्यासाठी त्यांना खूप कारणे मिळतात. या त्रासातून वाचण्यासाठी दोघांनी बसून चर्चा करावी. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच आपल्या वडीलधार्‍यांची मदत घ्यावी. ज्यामुळे तुमचे पूर्वीचे आयुष्य पून्हा परत मिळेल. यासाठी आणखीही काही टीप्स आहेत. त्या पुढीलप्रमाणे .. १. एकमेकांसाठी वेळ काढा
मुले झाल्यानंतर दाम्पत्य एकमेकांमध्ये इंटरेस्ट दाखवणे कमी करतात. हा बदल लग्न टिकून ठेवण्यात मोठा अडथळा ठरतो. जर तुम्हाला तुमच्या पत्नी वा पतीविषयी काही त्रास असेल तर त्याच्याशी बोला, ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. जेवढे होईल तेवढा वेळ एकमेकांसोबत घालवा.
२. शॉपिंग करायला जा
जर शॉपिंग केल्याने मूड चांगला होत असेल तर तुम्ही शॉपिंग करत जा. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून थोडा वेळ काढा आणि आपल्या मुलांसाठीही शॉपिंग करण्यासाठी
३. स्वप्न पाहणे सोडू नका
कधीही स्वप्ने पाहणे सोडू नये आणि नेहमी करिअरविषयी विचार करावा. आपल्या ध्येयाला कधीही विसरू नये . पुढेही काम करत रहावे म्हणून त्यात व्यस्त असणे गरजेचे आहे. आई झाल्यानंतर थोडेसे अवघड होऊ शकते पण एकदा जीवनशैली बनली तर काही अवघड होत नाही.
४. मुलांसाठी केअर टेकर शोधा
आईवडिलांसाठी नवीन मुलांना स्वत:पासून वेगळे ठेवणे थोडे कठीणच असते. कारण एका ठराविक वयानंतर मुलांसाठी नॅनी ठेवता येऊ शकते. जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा ती तुमच्या मुलांची देखभाल करेल. जर तुमच्या सासरची मंडळी मुलांची व्यवस्थित काळजी घेत असतील तर यापेक्षा आणखी काय चांगले असेल?

Web Title: Be happy after the birth of a child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.