साडी नेसताना या गोष्टी टाळा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 15:46 IST2017-01-10T15:46:34+5:302017-01-10T15:46:34+5:30
साडीमध्ये एकही मुलगी सुंदर दिसणार नाही, असे होऊच शकत नाही. साडी हा असा पेहराव आहे, ज्यात प्रत्येक मुलीचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, साडी जर योग्य प्रकारे नेसली नाही किंवा साडी नेसल्यानंतर योग्य साधनांचा वापर केला नाही तर आपला लूक नक्कीच बिघडतो.
.jpg)
साडी नेसताना या गोष्टी टाळा !
साडीमध्ये एकही मुलगी सुंदर दिसणार नाही, असे होऊच शकत नाही. साडी हा असा पेहराव आहे, ज्यात प्रत्येक मुलीचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, साडी जर योग्य प्रकारे नेसली नाही किंवा साडी नेसल्यानंतर योग्य साधनांचा वापर केला नाही तर आपला लूक नक्कीच बिघडतो. यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपण साडीत अजून सुंदर दिसाल.
* जास्त सेफ्टी पिन्स टाळा
साडी व्यवस्थित राहावी यासाठी बहुतेक मुली अनेक सेफ्टी पिन्स लावतात. जास्त पिना साडीवर चांगल्या दिसत नाहीत. यासाठी कमीत कमी सेफ्टी पिना लावा.
* मोठी पर्स नको
साडीवर मोठी पर्स अजिबात चांगली दिसत नाही. यामुळे आपणास मोठी पर्स अडकविण्याची गरज नाही. शिवाय मोठ्या पर्समुळे आपल्याला मॅनेज करण्यातसुध्दा अडचण येऊ शकते. यामुळे लहान पर्स सोबत ठेवा.
* चुकीची सँडल किंवा चप्पल टाळा
अनेक वेळा तरुणी कोणत्याही साडीवर कोणतेही फुटवेयर घालतात, असे करु नका. मॅचिंग फुटवेयरच घाला. असे नाही केले तर सर्व परिश्रम वाया जातील आणि ते चांगलेही दिसणार नाही.
* विना फिटींगचे ब्लाऊज नको
साडी नेसल्यावर लूज ब्लाऊज घालू नका. जास्तच फिटिंगचे ब्लाऊजसुध्दा चांगले दिसत नाही. योग्य फिटींगचे ब्लाऊजच साडीवर चांगले दिसतात. यामुळे तुम्ही आकर्षक दिसता आणि साडीही एकदम सुंदर दिसते.
* फ्लेयर्ड पेटीकोट नको
फ्लेयर्ड पेटीकोट घालू नका, जर तुम्हाला साडी घालण्याची सवय नसेल तर फिटिंगचे पेटीकोटच घाला, कारण यामध्ये तुम्ही खूप कंफर्टेबल फील करु शकता.
* चमचम साडी टाळा
साडी जेवढी डिसेंट आणि सोबर असेल तेवढीच चांगली दिसेल. भडक आणि चमचम साड्या बिलकुल चांगल्या दिसत नाही. साडी बरोबर योग्य ज्वेलरी घालणेही आवश्यक असते.
* ओव्हर मेकअप नको
साडी नेसली म्हणजे जास्त मेकअप करणेच गरजेचे नसते. अनेक वेळा मुली साडी नेसतात आणि त्यावर भरभरून मेकअप करतात. परंतु यावर सिंपल अँड सोबर मेकअप चांगला दिसतो. यामुळे गॉर्जिअस लूक येतो.