डॅँड्रफच्या समस्येने त्रस्त आहात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:25 IST2017-01-13T14:24:46+5:302017-01-13T14:25:10+5:30

डॅँड्रफ अर्थात केसातील कोंडा ही रुक्ष केसांची एक साधारण समस्या आहे आणि हिवाळ्यात तर ही समस्या अजूनच वाढते. आपणही जर या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांद्वारे ही समस्या दूर करु शकता.

Are you troubled with the problem of Dandruff? | डॅँड्रफच्या समस्येने त्रस्त आहात?

डॅँड्रफच्या समस्येने त्रस्त आहात?

ong>-रवीन्द्र मोरे 

डॅँड्रफ अर्थात केसातील कोंडा ही रुक्ष केसांची एक साधारण समस्या आहे आणि हिवाळ्यात तर ही समस्या अजूनच वाढते. आपणही जर या समस्येने त्रस्त असाल तर खाली दिलेल्या नैसर्गिक उपायांद्वारे ही समस्या दूर करु शकता. 

कोरफड-दही पॅक 
१ कप आंबट दह्यामध्ये २ चमचे कोरफड जेल मिक्स करा. या मिश्रणात विटॅमिन ई कॅप्सूूल किंवा आॅइल आणि निंबूचा रस मिक्स करुन पेस्ट तयार करा आणि केसांना लावा. एका तासानंतर शॅँपूने केसांना धुवा. 

आवळा-करी पॅक 
अर्धा कप दहीत २ चमचे मेथी, काही कढीपत्ता, २ आवळा घेऊन रात्रभर भिजवा. सकाळी सर्व मिक्स करुन पेस्ट करा आणि केसांना लावा. एक-दोन तासानंतर शॅँपूने धुवा. 

* मेंदी-लेमन पॅक 
केसांच्या कोणत्याही समस्येसाठी मेंदी एक उत्तम उपाय आहे. ५ चमचे मेंदी पावडर घेऊन त्यात १ चमचा निंबूचा रस, १ अंड्याचा पांढरा भाग, १ चमचा मेथी, १ चमचा व्हिनेगर, ४ चमचे दही मिक्स करुन रात्रभर भिजवून ठेवा. या पेस्टला सकाळी केसांना लावा आणि २-३ तासानंतर शॅँपूने धुवा.

ओटमील पॅक
ओटमील, फ्रेश दूध आणि बदामाचे तेल समान मात्रेत घेऊन पेस्ट तयार करा. ही पेस्ट केसांना लावा आणि २० मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून दोनदा करा.

जास्वंद पॅक
घराच्या बाहेर लावलेले जास्वंदाचे फूल घराचे सौंदर्य खुलविण्याबरोबरच केसांनादेखील डॅँड्रफ फ्री ठेवते. यासाठी जास्वंदाचे काही फूल किंवा पानांना पाण्यात टाकून ते पाणी काही वेळ गरम आचेवर ठेवा. पाणी थंड झाल्यावर त्या फुलांना किंवा पानांना एकजीव करुन पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये नारळ किंवा आॅलिव्ह आॅइलला कोमट करुन मिक्स करा आणि केसांमध्ये लावा आणि ३० मिनिटानंतर धुवा.   

होममेड शॅँपू 
१ चमचा शिकाकाई पावडर, १ चमचा मेथीची पाने (कोरडी) आणि १ निंबूची साल (कोरडी) हे सर्व एकत्र घेऊन पाण्यात भिजवा. हे मिश्रण म्हणजे एकप्रकारे होममेड शॅँपूच आहे. याने केसांना धुतल्यास डॅँड्रफच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. 

Web Title: Are you troubled with the problem of Dandruff?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.