'ही' तीन फळं चेहऱ्यावर येऊ देत नाही सुरकुत्या, तुम्ही कधीच नाही म्हातारे....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 10:41 AM2019-11-15T10:41:09+5:302019-11-15T10:46:53+5:30

फळं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. एक्सपर्ट सांगतात की, एका दिवसात दोन फळं खाल्लीत तर अ‍ॅंटी-एजिंग समस्या दूर होते.

Anti ageing fruits what are the best fruits for anti ageing | 'ही' तीन फळं चेहऱ्यावर येऊ देत नाही सुरकुत्या, तुम्ही कधीच नाही म्हातारे....

'ही' तीन फळं चेहऱ्यावर येऊ देत नाही सुरकुत्या, तुम्ही कधीच नाही म्हातारे....

Next

फळं आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरतात. एक्सपर्ट सांगतात की, एका दिवसात दोन फळं खाल्लीत तर अ‍ॅंटी-एजिंग समस्या दूर होते. फळांमधील अनेक पोषक तत्व वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांसोबत लढण्यासही मदत करतात. फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट असल्याने अनेक प्रकारच्या संक्रमणापासूनही तुमचा बचाव होतो. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तीन खास फळं फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ कोणती आहेत ही फळे...

सफरचंद 

(Image Credit : express.co.uk)

सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. तसेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतं. सफरचंद सालीसोबतच खाणं अधिक फायदेशीर असतं. अनेकजण साल काढून टाकतात, जे चुकीचं आहे. कारण या सालीमध्ये अ‍ॅंटी-एजिंग तत्व असतात. तसेच याने आतड्यांमध्ये गुड एंजाइम्स वाढतात, ज्याने तुमच्या शरीरात पाणी नियंत्रित राहतं.

पपई

पपईमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याचं सेवन केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. सुरकुत्याही दूर होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि त्वचेसाठी सर्वात फायदेशीर व्हिटॅमिन ई भरपूर असतात. त्यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम इत्यादीही आढळतात. पपईमध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यासही मदत करतात. याने वाढलेल्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसत नाही.

एवोकाडो

एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, बी आणि ए भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ए चं प्रमाण अधिक असतं. याने त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यास आणि नवीन पेशीचं निर्माण करण्यास मदत मिळते. यातील कॅरोटेनॉइडमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही बचाव होतो.


Web Title: Anti ageing fruits what are the best fruits for anti ageing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.