अनिल कपूर चुकीच्या जाहिरातीमुळे अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 16:38 IST
एका कन्स्ट्रक्शन कं पनीची चुकीच्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत येण्याची शक्यता आहे.
अनिल कपूर चुकीच्या जाहिरातीमुळे अडचणीत
एका कन्स्ट्रक्शन कं पनीची चुकीच्या जाहिरातीमुळे अनिल कपूर अडचणीत येण्याची शक्यता आहे. संबंधीत क न्स्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात आलेल्या जाहिरातीत म्हाडापेक्षा त्यांच्या घरांच्या किं मती कमी असल्याचा दावा केला होता. तसेच कंपनीने जाहिरातीत विरार व नाशिकमध्येदेखील घरे असल्याचे सांगितलं होते, यावरूनच म्हाडानं अनिल कपूरला कायदेशीर नोटीस बजावली आहे. अनिल कपूरबरोबरच म्हाडानं या कन्स्ट्रक्शन कंपनीलाही नोटीस पाठवली आहे. कंपनीनं फायद्यासाठी म्हाडाचं अयोग्य पद्धतीनं नाव वापरलं, तसंच चुकीची माहिती जाहिरातीतून दिलं असं या नोटीसमध्ये मांडण्यात आलं आहे.