आवळ्याचे 'हे' 2 हेअर मास्क वापरा; केस होतील चमकदार आणि मुलायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 14:55 IST2019-09-28T14:48:55+5:302019-09-28T14:55:23+5:30
बदलतं वातावरणं आपल्यासोबतच इतर अनेक बदल घडवून आणतं. आरोग्य, त्वचा आणि केस यांमध्ये अनेक बदल घडून येतात. आज आम्ही तुम्हाला केसांबाबत सांगणार आहोत. अनेकदा बदलत्या वातावरणामध्ये केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

आवळ्याचे 'हे' 2 हेअर मास्क वापरा; केस होतील चमकदार आणि मुलायम
बदलतं वातावरणं आपल्यासोबतच इतर अनेक बदल घडवून आणतं. आरोग्य, त्वचा आणि केस यांमध्ये अनेक बदल घडून येतात. आज आम्ही तुम्हाला केसांबाबत सांगणार आहोत. अनेकदा बदलत्या वातावरणामध्ये केसांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने केस गळणं आणि केस कोरडे होणं या समस्यांचा समावेश होतो. अशातच काही लोकांचे केस काळे आणि दाट असतात पण बाउंसी असत नाहीत. अशातच आज आम्ही तुम्हाला आवळ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या काही हेअर मास्कबाबत सांगणार आहोत. हे हेअर मास्क फक्त केस गळण्यापासून रोखणार नाहीत तर केस शाइन आणि बाउंसी होण्यासाठीही मदत करतील.
काही लोकांचे केस काळे आणि दाट असतात. परंतु, बाउंसी असत नाहीत. अशातच आज आम्ही तुम्हाला आवळ्याचे काही असे हेअर मास्क सांगणार आहोत. जे केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.
नॅचरल कंडिशनिंगसाठी खोबऱ्याचं तेल आणि आवळ्याचा हेअर मास्क
केस निस्तेज किंवा कोरडे झाले असतील तर खोबऱ्याचं तेल आणि आवळ्यापासून तयार करण्यात आलेल्या हेअर मास्कचा वापर करू शकता. खोबऱ्याचं तेल आणि आवळा दोन्ही केसांसाठी रामबाण औषध ठरतात. ज्यामुळे केस नॅचरली कंडिशनिंग होण्यासाठी मदत होते. तसेच यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि अॅन्टीबॅक्टेरियल तत्व आढळून येतात. ज्यामुळे स्काल्पमध्ये इन्फेक्शन होत नाही.
असा करा वापर...
सर्वात आधी एक पॅन घ्या. त्यामध्ये खोबऱ्याचं तेल एकत्र करून व्यवस्थित गरम करा. जेव्हा तेल व्यवस्थित गरम होईल त्यानंतर गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यामध्ये आवळ्याचं तेल एकत्र करा. आता या तेलाने आठवड्यातून दोन वेळा मालिश करा. रात्रभर ठेवून सकाळी सल्फेट फ्रि शॅम्पूच्या मदतीने केस स्वच्छ धुवून घ्या.
गळणाऱ्या केसांसाठी आवळा आणि शिकेखाई मास्क
गळणाऱ्या केसांच्या समस्येने प्रत्येकजण त्रस्त आहे. अशातच तुम्ही हा मास्क वापरू शकता. शिकेखाई फक्त केस गळण्याचं प्रमाण कमी करणार नाही तर त्यामुळे केस पांढरेही होणार नाहीत. तसेच आवळा स्काल्प हेल्दी करण्यासाठीही मदत करतो.
असा करा वापर...
आवळा आणि शिकेखाईचा वापर करण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये चहा पावडर पाण्यात उकळून घ्या. पाणी थंड होण्यासाठी ठेवा आणि त्यानंतर त्यामध्ये आवळा आणि शिकेखाई पावडर एकत्र करा. तयार मिश्रण मेहंदीप्रमाणे केसांना लावा. आंघोळीच्या 40 मिनिटांआधी ही पेस्ट केसांना लावा. त्यानंतर एखाद्या माइल्ड शॅम्पूच्या मदतीने केस धुवून घ्या.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)