वयोमानानुसार वाढतो हँगओव्हरचा त्रास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 14:09 IST2016-01-16T01:14:44+5:302016-02-10T14:09:27+5:30
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वयोमानानुसार हँगओव्हरचा त्रास्त वाढतो.

वयोमानानुसार वाढतो हँगओव्हरचा त्रास
ल ट नाईट पार्टी, बर्थ-डे, प्रोमोशन, लग्न, ब्रेक-अप किंवा न्यू ईअर. निमित्त काहीही असो. बर्याच तळीरामांना ग्लास भरल्याशिवाय होतच नाही. तेवढय़ा वेळेपुरती जरी ही मौजमजा वाटत असली तरी सकाळी उठल्यावर हँगओव्हरमुळे रात्री जरा कमीच घ्यायला हवी असे वाटते.
तुमचीही स्टोरी जर अशी असेल तर थोडा विचार करा. कारण आरोग्यतज्ज्ञांच्या मते, वयोमानानुसार हँगओव्हरचा त्रास्त वाढतो. त्यामुळे वाढत्या वयात मद्यसेवन नियंत्रित ठेवणेच फायद्याचे ठरेल. नानावती हॉस्पिटलचे डॉ. राहुल तांबे सांगतात, 'वय जसे वाढते तशी यकृताची अल्कोहोल पचविण्याची क्षमता कमी होते.
मेटाबॉलीजिंग एन्झायम्स घटल्यामुळे शरीरात फॅट वाढून मसल मास घटते आणि त्यामुळे अल्कोहोलचा परिणाम आणखी वाढतो.' वय वाढत असताना काही लोक हे विविध गोळ्या-औषधांचे सेवन करत असतात. त्याचा अल्कोहोल मेटाबॉलिजमवर विपरित परिणाम होतो.
वजन घटल्यामुळे शरीरातील अल्कोहोलचे वितरण व्यवस्थित होत नाही. हेच कारण आहे की, हँगओव्हरचा त्रास वाढतो.