पुरुषांनी चेहऱ्याची घ्यावी अशी काळजी, दिवसभर चेहरा राहील चमकदार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 11:33 IST2018-11-07T11:26:16+5:302018-11-07T11:33:15+5:30
चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो.

पुरुषांनी चेहऱ्याची घ्यावी अशी काळजी, दिवसभर चेहरा राहील चमकदार!
चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. अचानक येणारे पिंपल्स किंवा स्किन इन्फेक्शन कुणासाठीही डोकेदुखी ठरु शकते. पण चांगली बाब ही आहे की, ही समस्या तुम्हाला वेळीच दूर करता येऊ शकते. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या माध्यमातून तुम्ही चेहऱ्याची स्वच्छता चांगल्याप्रकारे करु शकता. असे केले तर तुमच्या चेहऱ्याची चमक कायम राहील. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फार मेहनत करण्याचीही गरज नाहीय.
चेहरा साफ करणे
सर्वातआधी चेहरा पाण्याचे चांगला धुवा. चेहरा धुणे याचा अर्थ चेहऱ्या पाण्याचे काही थेंब शिंपडणे नाही. चेहरा धुण्यासाठी तुम्ही एखादा चांगला साबण किंवा चांगल्या फेसवॉशचा वापर करु शकता.
शेविंग करताना काळजी
चेहऱ्याचं चांगलं-वाईट दिसणं हे तुमच्या शेव्ह करण्याच्या पद्धतीवरही अवलंबून असतं. रेजरमुळे त्वचेची जळजळ होऊ शकते आणि काही दिवसांनी पिंपल्सही येऊ शकतात. त्यामुळे रेजरचा वापर काळजीपूर्वक करा आणि योग्य त्या शेव्हिंग क्रिम-जेलचा वापर करावा. यानेही तुमची समस्या दूर होईल. इतकेच नाही तर त्वचा आणखी चांगली करण्यासाठी पोस्ट-शेव्ह बामचाही वापर करा.
मृत पेशी दूर करा
चेहऱ्यावरील मृत पेशी दूर करण्याचं काम केवळ महिलांचं नाहीये. ही काळजी पुरुषांसाठीही गरजेची आहे. आठवड्यातून कमीत कमी एकदा चेहऱ्याच्या मृत पेशी दूर कराव्यात. याने चेहऱ्याची सर्व घाण निघून जाते आणि रोमछिद्र मोकळे होतात. यासाठी तुम्ही घरीच तयार केलेला एखादा स्क्रब वापरु शकता.
मॉईश्चराइज
चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी चेहरा ड्राय होऊ देऊ नका. चेहऱ्याचा ओलावा कायम ठेवण्यासाठी तुम्ही जेल बेस्ड एखाद्या मॉइश्चरायजरचा प्रयोग करु शकता. याचा तुम्ही दररोज वापर करु शकता.
हायड्रेट रहा
वरील सर्व महत्त्वाच्या गोष्टींसोबतच तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे पाणी. पाणी केवळ तुमची तहान भागवतं असं नाही तर तुमच्यासाठी औषध म्हणूनही काम करतं. पाण्याच्या कमतरतेमुळे चेहऱ्यायाचा ग्लो नष्ट होतो. जर तुम्हाला चेहऱ्याची चमक कायम ठेवायची असेल तर दिवसातून कमीत कमी ८ लिटर पाणी प्यावं लागेल. याचा अर्थ एकावेळी फार जास्त पिऊ नये. दिवसभर थोडं थोडं पाणी प्यायल्यासही चालतं.